Site icon Maharajya Times

उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतोय? मग सेवन करा सब्जाच्या बिया

Benefits of Basil Seeds:

सब्जाच्या बिया या अत्यंत गुणकारी आहेत. आयुर्वेदात या बियांचे खूप महत्व सांगण्यात आले आहे. फक्त फिटनेस प्रेमीच नाही तर सगळे जण या बियांच सेवन करतात कारण याचा सर्वात मोठा फायदा हा आहे कि उष्णेतेमुळे होणारा शरीराचा दाह कमी करण्यात या बिया खूप फायदेशीर आहेत. आजकाल याला सुपर फूड सुद्धा म्हणण्यात येते. तर जाणून घेऊया या बियांचे अजून खूप सारे फायदे. 


1. वजन आटोक्यात राहण्यासाठी

सब्ज्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे पोट भरून जाते आणि एक तृप्तपणा जाणवतो. त्याचा कारण असे आहे कि या बियांमध्ये उच्च फायबर कन्टेन्ट आहे. यामुळे तुम्हाला भूक कमी लागते व कमी खाऊन पण एनर्जेटिक राहण्यास मदत होते. म्हणूनच वजन आटोक्यात राहून शरीरास फायदा होतो. आणि बऱ्याच आजारांपासून आपले संरक्षण होते.


2. ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत

सब्ज्याच्या बियांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि इतर पॉलिफेनॉल्ससह वनस्पती संयुगे समृद्ध प्रमाणात असतात. फ्लेव्होनॉइड्स अँटिऑक्सिडंट्स आहेत, म्हणजे ते पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या धोक्यापासून वाचवतात. सुदृढ आणि दीर्घायुषी होण्यास फायदेशीर आहे.


3. पचन संस्थेस साहाय्यकारी

या बियांमध्ये फायबर हे प्रचुर प्रमाणात असल्यामुळे पचनास खूपच साहाय्यकारी आहे. यामुळे आतडे निरोगी राहते. बद्धकोष्ठता होत नाही. या बियांच्या पाणी शोषण्याच्या गुणधर्मामुळे या बिया पाणी शोषून जेलीसारख्या होतात. आतड्याचा हालचालींना प्रोत्साहन देऊन पचनास गुणकारी ठरतात.


4.पोषक तत्वांनी समृद्ध

(Basil Seeds) या बियांची पौष्टिक रचना लोक त्यांना कुठे वाढवतात यावर अवलंबून असते. संशोधनात असे आढळून आले आहे कि प्रत्येक १०० ग्रॅम सब्जा बियांमध्ये खालील प्रमाणे पोषक तत्वे असतात:

100 ग्रॅम सब्जा बियांमध्ये असलेली मुख्य खनिजे :


5.शरीर थंड राहण्यासाठी

आयुर्वेदानुसार, सब्ज्याच्या बिया शरीरावर थंड प्रभाव टाकतात. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि उष्णतेशी संबंधित अस्वस्थतेपासून आराम देण्यासाठी उन्हाळ्यातील कूलर सारख्या पेयांमध्ये या बिया लोकप्रिय घटक बनतात. उन्हाळ्यात जसे वरून आपण शरीर थंड राहण्यासाठी सतत अंघोळ करतो किंवा पंखा, एसी सारख्या उपकरणाचा फायदा घेतो तसेच शरीर आतून थंड राहण्यासाठी या बिया कुलर चं काम करतात.


सब्जा बियांचे (Basil Seeds) आपण वेग वेगळ्या आणि चविष्ट पद्धतीने सेवन करू शकतो. आता उन्हाळ्यात जेवण करण्या ऐवजी वेग वेगळी पेय पिण्याची खूप इच्छा होते व त्यामुळे शरीरात पाणी साठून राहते म्हणजेच हायड्रेशन मेंटेन होते. तर या बिया आपण पाण्यात भिजवून कुठल्याही पेयात जसं कि लिंबू पाणी, फळांचा रस, मिल्क शेक्स आणि फालुदा यामध्ये मिक्स करून पियू शकतो. तर जरूर सेवन करा या गुणकारी सब्जा बियांचे आणि निरोगी राहा.


सब्जा बियांच्या रेसिपी बघण्यासाठी, पहा हा व्हिडीओ:

Exit mobile version