साजिद नाडियाडवाला बनवणार मराठी चित्रपट : तेजस्विनी पंडित सोबत केले टाय-अप

Sajid Nadiadwala collaborated with Tejaswini Pandit

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक साजिद नाडियाडवाला याने मराठी चित्रपट बनवण्याचे घोषित केले आहे. तेजस्विनी पंडित सोबत सहयोगाने तो हा चित्रपट बनवणार आहे. खरं तर साजिद नाडियाडवाला ची पत्नी वरदा हिने तेजस्विनी पंडित च्या सह्याद्री फिल्म्स या प्रोडक्शन सोबत तिच्या जोफिल एंटरप्राइज या प्रोडक्शन कंपनीमार्फत टाय अप केलं आहे, मराठी चित्रपटांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी.

या टाय अप विषयी बोलताना, निर्माती वर्दा नाडियाडवाला यांनी मराठी भूमी, संस्कृती आणि भाषेशी संबंध व्यक्त केला. तेजस्विनी पंडित यांच्यासोबत काम करण्यासाठी ती आणि साजिद खूप उत्सुक आहेत. कारण त्यांचे उद्दिष्ट आहे कि प्रेक्षकांना नवीन दृष्टीकोन आणि प्रभावशाली कथा पाहावयास मिळावी.

“माझा मराठी चित्रपटांबद्दल तेजस्विनीच्या अंतर्दृष्टीवर विश्वास आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीच्या या नव्या प्रवासाला सुरुवात करताना आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू इच्छितो आणि तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची अपेक्षा करतो,”

वरदा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने या भागीदारीवर भाष्य करताना सांगितले की,

“हे सहकार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी हा विशेषाधिकार आहे. मराठी चित्रपट त्यांच्या प्रतिभावान कलाकारांसाठी आणि निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत, प्रेक्षकांपर्यंत अविस्मरणीय सामग्री पोहोचवण्यासाठी सुद्धा. पण मराठी चित्रपटांमध्ये अनेकदा डिलिव्हरीचा अभाव असतो. साजिद नाडियादवाला आणि वर्धा नाडियादवाला यांच्यासोबत, आम्ही ही परिस्थिती बदलण्याचे ध्येय ठेवतो. ही भागीदारी गेम चेंजर ठरेल.”

तेजस्विनी पंडित, मराठी अभिनेत्री आणि निर्माता

चित्रपट समीक्षक, व्यवसाय विश्लेषक तरन आदर्श यांनी या बाबतीत एक पोस्ट हि टाकले आहे त्यांचा एक्स ऑफिशिअल हँडलवर.


Leave a Comment