Sai Tamhankar gifted herself a brand new Mercedes Benz GLE:
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सई ताम्हणकरने नवी कोरी मर्सिडीज बेन्झ खरेदी केली आहे. जिची किंमत मार्केटमध्ये ₹ १.१५ करोड इतकी आहे.
याबाबत तिने तिच्या इन्स्टाग्राम च्या ऑफिसिअल हँडलवर एक पोस्टही शेयर केले आहे. तिने पोस्ट मध्ये लिहिले आहे कि,
” तुम्ही काय करू शकता किंवा करू शकत नाही हे कोणालाही सांगू देऊ नका. स्वप्न पहा, ते साध्य करा, ते जगा! जसे आपण नवीन वर्ष सुरू करतो; चला नवीन ध्येये सेट करूया आणि ती एकत्रितपणे साध्य करूया !! पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. 🧿 #saitamhankar #mercedesebenz #benzgal.” आणि व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.
यावर तिच्या फॅन्स आणि फॉलोवर्सनी कमेंट मध्ये खूप शुभेच्छा दिल्या आहेत. बघा तो शेयर केलेला व्हिडीओ:
View this post on Instagram
स्वतःला हि कर गिफ्ट करून ती खूप खुश आहे. आणि इंडस्ट्रीमधील बऱ्याच लोकांनी तिला अशीच प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
तिच्या फिल्म आणि वेब सिरीजच्या यशस्वी कारकिर्दीमुळे आज ती या यशाच्या स्थरावर पोहोचली आहे. एक मराठी मुलगी इंडस्ट्रीमध्ये कष्ट करून आपले पाय रोवू शकली याचा प्रत्येक मराठी प्रेक्षकाला सार्थ अभिमान आहे.
सई शेवटची नेटफ्लिक्स चित्रपट “भक्षक” मध्ये दिसली होती, ज्यात संजय मिश्रा आणि आदित्य श्रीवास्तव यांच्यासोबत भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत होते. त्यात तिने “एसएसपी जसमीत कौर” या भूमिकेत उत्तम काम केले.
ती मराठी चित्रपट “श्रीदेवी प्रसन्न” चा देखील एक भाग होती. यात सिद्धार्थ बोडके, सिद्धार्थ चांदेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत दायमा, शुभांगी गोखले, सानिका काशीकर आणि समीर खांडेकर यांनी भूमिका केल्या होत्या.