Marathi Bhasha Din 2024 : दिनांक २७ फेब्रवारीला मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषा आणि साहित्याला जगभर पसरवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी विशेष करून हा दिवस साजरा केला जातो. जाणून घ्या सर्वकाही या ठिकाणी :
दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी दिवस साजरा केला जातो. सर्व मराठी लोक व महाराष्ट्रातील जनता हा दिवस आवडीने साजरा करतात.
मराठी भाषा हि भारतातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक भाषा आहे. जिचा इतिहास आणि साहित्य हे खूप प्रगल्भ आहे. या भाषेने आज पर्यंत अनेक थोर कवी, लेखक आणि विद्वान या भारत भूमीला प्रदान केले आहेत. भारताच्या सांस्कृतिक वारस्यात मराठी भाषेचं अनुदान खूप मोठ आहे.
मराठी भाषेने दिलेल्या साहित्य, संगीत आणि कला यामध्ये समाजाला दिलेल्या योगदानाचं महत्व सर्वाना कळावे यासाठी हा मराठी भाषा दिन आपण अगदी उत्साहात साजरा केला पाहिजे आणि आपण ते करत आलो आहोत. हा वारसा असाच पुढे चालत राहिला पाहिजे. पुढच्या अनेक पिढींना हा इतिहास नक्की पोहोचला पाहिजे.
मराठी भाषा दिवस महत्व :
आता हा दिवस २७ फ्रेब्रुवारीलाच का साजरा करतात, तर या दिवशी प्रसिद्ध मराठी कवी, कादंबरीकार आणि नाटककार विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती असते. याना आपण कुसुमाग्रज या नावाने पण ओळखतो.
मराठी भाषेच्या साहित्य समृद्धीला प्रणाम करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. म्हणून विशेष करून कुसुमाग्रजांच्या जयंतीला मराठी भाषा दिवस म्हणून निवडल गेल आहे.
कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला राजभाषेच स्थान मिळाव यासाठी पुढाकार घेतला होता. मराठी साहित्यातील अमूल्य योगदाना बद्दल कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कुसुमाग्रजांच्या लिखाणातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे “नटसम्राट” हे नाटक आणि “विशाखा” हा काव्यसंग्रह. त्यांनी कविता, निबंध, कादंबरी, नाटक आणि लघुकथा अशा अनेक साहित्यकृती लिहिल्या आहेत.
या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद आणि काव्य वाचन याच आयोजन केल जातं. शाळांमध्ये विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन केलं जात जेणेकरून विध्यार्थ्यांना मराठी भाषेचं महत्व आणि इतिहास कळावा.
महाराष्ट्र शासनही मराठी भाषेचा प्रभाव वाढावा आणि साहित्याचा संवर्धन व्हावं यासाठी विशेष पुढाकार घेतं.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
सर्व मराठी बांधवांना आणि भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!