प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली कल्कि धाम ची पायाभरणी

Kalki Dham: कल्की धाम

कल्की धाम कडे सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे. कारण कालच १९ फेब्रुवारी २०२४ ला, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेश च्या संभल जिल्ह्यात कल्की धाम ची पायाभरणी केली.

ह्या महत्वपूर्ण सोहळ्यांमध्ये बरेच मान्यवर, संत आणि धार्मिक नेते उपस्थित होते. कल्की धाम मंदिराचे निर्माण कार्य हे कल्की धाम निर्माण ट्रस्ट च्या अंतर्गत होणार आहे. या ट्रस्ट चे चेरमन आचार्य प्रमोद कृष्णम आहेत. कल्की अवतार हा भगवान विष्णूंचा १० अवतार होणार असल्यामुळे, सर्व देशवासियांचे लक्ष इकडे केंद्रित झाले आहे.


कल्की अवतार (Kalki Avatar):

हिंदू धर्म ग्रंथांनुसार कल्की अवतार हा श्री विष्णूंचा १० प्रमुख अवतारांमधील १० वा अवतार आहे. त्यापैकी ९ अवतार हे आधीच झालेले आहेत. शेवटचा झालेला अवतार हा भगवान बुद्धांचा आहे. ज्यांनी नेपाळमधील लुम्बिनी या ठिकाणी अवतार घेतला होता. आणि हा कल्की अवतार उत्तर प्रदेश मधील संभल ह्या ठिकाणी होणार असं हिंदू ग्रंथांमध्ये वर्णन केलं आहे.

कल्की अवतार वर्णन (Appearance of Kalki avatar):

Kalki Avatar
Kalki Avatar

हिंदू ग्रंथ श्रीमद भागवतं मध्ये असं लिहिला आहे कि कलियुगाच्या शेवटी म्हणजे आता जे युग चालु आहे त्याच्या शेवटी हा श्री विष्णूंचा अवतार होणार आहे. जेव्हा जेव्हा या सृष्टी मध्ये दुष्ट शक्तींचा प्रादुर्भाव वाढतो आणि एक समतोल निर्माण करण्याची गरज भासते तेव्हा स्वतः भगवान श्री विष्णू अवतार घेतात असं ग्रंथामध्ये वर्णन आहे. आणि त्याचाच भाग म्हणून हा श्री विष्णूंचा १० अवतार म्हणजे कल्की अवतार आहे.

आत्ता पर्यंत श्रीमद भागवतं ग्रंथातील केलेल्या वर्णनानुसार जे कल्की भगवंताच चित्र काढण्यात आले आहे किंवा मिळालेलं आहे. त्या मध्ये श्री कल्की भगवान हे त्यांच्या देवदत्त या घोड्यावर स्वार होऊन येतील, त्यांच्या हातामध्ये तलवार असेल आणि कलियुगाच्या शेवटी सृष्टीमधील सर्व दुष्टांचा ते नाश करतील.


मंदिर बांधकाम संबंधित (Temple construction):

विशेष म्हणजे कल्की अवतार होण्याआधीच हे मंदिर बांधण्यात येत आहे, जसं कि हिंदू धर्म ग्रंथांमध्ये वर्णन केलं आहे हा अवतार कली युगाच्या शेवटी होणार आहे. कल्की धाम पूर्ण होण्यासाठी साधारण पाच वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. हे धाम साधारण ५ एकर च्या आवारामध्ये बांधल जाईल. या मंदिराच्या बांधकामासाठी गुलाबी रंगाचा दगड वापरण्यात येईल जो अयोध्या मंदिराच्या बांधकामासाठी सुद्धा वापरण्यात आला होता. तसाच सोमनाथ मंदिरासाठी सुद्धा असा गुलाबी रंगाचा दगड वापरण्यात आलेला आहे. मंदिर बांधकाम शैली सुद्धा त्यांच्याशी मिळती जुळतीच असेल. मंदिराचं शिखर हे साधारण १०८ फूट उंचीवर असेल आणि नोंदणीनुसार ६८ तीर्थ क्षेत्रे मंदिर परिसरात बांधली जातील.

मूर्ती निर्मिती आणि सोहळा (Creation of Idol and Ceremony):

मूर्ती निर्माण करण्यासाठी धर्म ग्रंथांमधील वर्णन संधर्भ म्हणून वापरण्यात येईल. ज्या मध्ये भगवान शिवांचा पांढरा घोडा देवदत्त, भगवान परशुरामांची तलवार आणि बृहस्पतींकडून घेतलेलं ज्ञान याचा समावेश असेल. प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा श्रीराम मंदिर प्रमाणेच भव्यरित्या साजरा केला जाईल.


Leave a Comment