इंस्टाग्रामच्या रिल्स मध्ये एका नवीन फिचर ची वाढ होण्याची शक्यता,काय आहे हे ‘ब्लेंड’ फिचर ?

Instagram may introduce blend feature in reels

Instagram may introduce “Blend” feature for its users in reels:

इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी नवीन ‘ब्लेंड ‘ हे फिचर सादर करू शकते. शेअर्ड रील्सवर आधारित खाजगी फीड तयार करण्यासाठी याचा वापर होऊ शकेल. वापरकर्ते कधीही त्यांना हवे असेल तेव्हा ब्लेंड सोडू शकतात. हे फिचर अद्याप अंतर्गत चाचणीच्या स्टेजमध्ये आहे, अद्याप बाह्यरित्या चाचणी किंवा वापर केलेला गेला नाही आहे.

सध्या यूजर्स इंस्टग्राम रिल्स चा खूप वापर करतात त्यांच्या आवडीच्या विषयावर स्वतःची मते मांडण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी.

याबाबत रिवर्स अभियंता एलेजांद्रो पलुझि यांनी सांगितले की, “इंस्टाग्राम ब्लेन्डवर काम करत आहे: #Reels शिफारशी तुम्ही एकमेकांना शेअर केलेल्या रील्सवर आणि तुमच्या रील्सच्या आवडींवर आधारित आहेत. दोन वापरकर्त्यांमध्ये मधील हे खाजगी राहील. तुम्ही कधीही ब्लेंड सोडू शकता.” हि माहिती त्यांनी एक्स च्या ऑफिसिअल हँडलवर शेयर केली आहे.

हे नवीन फिचर त्याच्या वापरकर्त्यांस त्याचा मित्रांना हे वापरण्यासाठी आमंत्रण पाठवण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. एकदा परवानगी दिल्यानंतर दोन यूजर्स त्यांच्या एकमेकांच्या इंटरेस्ट च्या ब्लेंड फीडला ऍक्सेस करू शकतील यामुळे त्यांच्यातील मैत्रीसंबंधाला इंटरेस्ट शेयरिंगमुळे एक नवी बहार येईल.

हे येणारे फिचर २०२१ मध्ये स्पॉटिफाय ने प्रदर्शित केलेल्या फीचरशी मिळते जुळते आहे असं टेकक्रंचने दिलेल्या अहवालात सांगितलं आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या गाण्यांना सामायिक केलेल्या प्लेलिस्टमध्ये एकत्र करण्यास अनुमती देते. इंस्टाग्रामने मात्र टेकक्रंचला पुष्टी केली की नवीन वैशिष्ट्य सध्या अंतर्गत प्रोटोटाइप आहे आणि बाहेरून चाचणी केली जात नाही.

Leave a Comment