Indian Students in the USA Struggle for Summer Internships, despite doing study from reputed universities:
अमेरिकेतील नोकऱ्यांच्या वाढीतील मंदीमुळे भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Students in the USA ) ज्यांनी आयव्ही लीग विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्यांना सुद्धा आगामी उन्हाळ्यात इंटर्नशिप मिळवण्यात अडचणी येत आहेत. एका एक्स्पर्टनुसार ज्यांना या परिस्थितीची माहिती आहे. सांगतात कि अनेक विद्यार्थी इंटर्नशिप ऑफर मिळवू शकले नाहीत. अत्यंत स्पर्धात्मक नोकरीच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी व्यावहारिक अनुभव मिळविण्यासाठी ज्या खूप आवश्यक आहेत.
विद्यार्थी, शिक्षण सल्लागार आणि यूएसमधील भारतीय-अमेरिकन व्यावसायिकांनी म्हटले आहे कि, जागतिक आर्थिक मंदीचा प्रवेश स्तरावरील नोकरीच्या संधींवर लक्षणीय परिणाम झाला आहे. निवडणुकीच्या वर्षात स्थानिक विद्यार्थ्यांना नोकरी देण्याच्या अनेक कंपन्यांच्या प्रवृत्तीमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. असाही दावा त्यांनी केला आहे हे अहवालानुसार स्पष्ट होत आहे.
आणखी एक संकट म्हणजे, या वर्षी अमेरिकेतील विद्यापीठांमधून पदवीधर झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांना राहणीमानाचा वाढता खर्च, उच्च महागाई दर, स्थानिक बेरोजगारी आणि स्पॉन्सरशिप समस्या यासारख्या अतिरिक्त आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
Challenges for Indian Students in the US :
शिक्षण सल्लागार कंपनी कॉलेजिफाय(Collegify) चे सह-संस्थापक आदर्श खंडेलवाल म्हणाले कि,
“इस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्टमध्ये अंतिम वर्षात सुमारे 400 अंडर-ग्रॅज्युएट विद्यार्थी होते, ज्यात आयव्ही लीग कॉलेज्यांचा समावेश होता, ज्यांना मी अनेक वर्षांपासून सल्ला दिला, ज्यांना या उन्हाळ्यात इंटर्नशिपची ऑफर मिळाली नाही.”
आयव्ही लीग, एक विद्यापीठांचा समूह ज्यामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी, येल युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांसह ईशान्य युनायटेड स्टेट्समध्ये स्थित आठ खाजगी विद्यापीठांचा समावेश आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी हे लीग प्रसिद्ध आहे.
खंडेलवाल यांच्या मते, “एनवाययू स्टर्न, यूसी बर्कले, ब्राउन युनिव्हर्सिटी, पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटी आणि ऑस्टिन येथील टेक्सास युनिव्हर्सिटी यांसारख्या टॉप यूएस कॉलेजमध्येही भारतीय, संघर्ष करत आहेत. यातील बरीच मुले आमच्यापर्यंत पोहोचली आहेत ज्यांना भारतात प्लेसमेंट हवी आहे.”
खंडेलवाल यांनी 22 वर्षीय एका हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याचे उदाहरण दिले, ज्याने त्याच्या अंतिम वर्षात मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात मेजर केले होते, जो गेल्या सहा महिन्यांत अनेक कंपन्यांमध्ये अर्ज करूनही समर इंटर्नशिप मिळवण्यात अयशस्वी ठरला आहे.
तंत्रज्ञान, सल्लागार आणि नवीन युगातील कंपन्या आता एकतर कर्मचारी काढून टाकत आहेत किंवा नियुक्ती स्थगित करत आहेत. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, विज्ञान आणि गणित (STEM) क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सध्याचे रोजगार मार्केट आव्हानात्मक ठरत आहे.
खंडेलवाल म्हणाले, “एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) किंवा उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा घटक असल्याशिवाय, व्हॅनिला कोडिंग कौशल्यांसाठी क्वचितच नोकऱ्या आहेत.”
एका अग्रगण्य सल्लागार कंपनीतील एका भारतीय अमेरिकन कर्मचाऱ्याने, ज्याने नाव गुप्त ठेऊन खुलासा केला कि, “माझी फर्म भारतीयांपेक्षा अमेरिकन लोकांना कामावर ठेवण्यास प्राधान्य देते.”
हि परिस्थिती असताना देखील अमेरिकन महाविद्यालयांनी भारतासह परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे सुरू ठेवले आहे. युनायटेड स्टेट्समध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वकालीन उच्चांक गाठत आहे.