(Benefits of Chia seeds): चिया सीड्स हे मूळचे मेक्सिको मध्ये उत्पादित होणारे बीज आहे. या बिया साल्विया हिस्पॅनिका नावाच्या फुलं झाडापासून प्राप्त केल्या जातात. हे झाड मिंट (पुदिना)झाडांच्या प्रकारात मोडते. या बियांचा रंग राखाडी असतो व त्यावर पांढरे आणि काळे ठिपके असतात. सध्या भारतीय बाजारामध्ये तुम्हाला कुठेही या मिळून जातील. भारतामध्ये सुध्दा याचे उत्पादन होते. चला पाहूया याचे फायदे.
चिया सीड्स सेवन करण्याचे आरोग्यदायी फायदे:
1.फ्री रॅडिकलशी लढा देण्यास मदत करते:
आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात त्याचाशी लढा देण्यास या बिया खूप गुणकारी असतात. बऱ्याच कारणांमुळे शरीरात हे फ्री रॅडिकल्स तयार होतात, जसे कि अति जंक फूड खाल्यामुळे, धूम्रपान केल्याने आणि केमिकल्सशी जास्त संबंध आल्याने इत्यादी. अति अपचन झाल्यामुळे सुद्धा हे तयार होण्याची संभावना असते.
चिया सीड्स अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे या फ्री रॅडिकल्स मुले होणारे ऑक्सिडेशन थांबवण्यास मदत करतात. ज्यामूळे आपल्या पेशी ह्या दीर्घायुषी होऊन आपले आरोग्य छान राहते.
2.रक्तातील शुगर लेवल सुधारते:
चिया सीड्स फायबरयुक्त असल्यामुळे शरीरास खूप लाभदायी असतात. याच्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध कमी होतो आणि रक्तातील शुगर लेव्हल मेंटेन राहते. संशोधन केल्यानंतर असे लक्षात आले आहे कि याच्यामुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
3.शरीराचे वजन हेल्दी ठेवते:
या बिया पोटात गेल्यानंतर पाणी शोषून घेतात आणि मोठ्या होतात. ज्यामुळे थोड्या जरी बिया खाल्या तरी पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही इतर पदार्थ कमी खाता ज्यामुळे वजन मेंटेन राहते. व या बिया आरोग्यास चांगल्या असल्यामुळे सेवनास चांगल्या आहेत. पण याच सेवन हे थोड्या थोड्या प्रमाणातच केलं पाहिजे. दिवसाला साधारण २ टेबलस्पून म्हणजे ३० ग्रॅम पर्यंत यांचे सेवन योग्य आहे. अति सेवन केल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. तर प्रमाणातच सेवन करावे.
4.हाडांचे आरोग्य चांगले होते:
या बियांमधील फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे हाडांच्या आरोग्यसाठी अतंत्य फायदेशीर आहे. मज्जातंतूच्या सुरळीत कार्यासाठी हे खूप चांगल आहे. USDA(U. S. Department of Agriculture),अमेरिकेच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार या बियांच्या १०० ग्रॅम मध्ये साधारण ६३१ मिलिग्रॅम कॅल्शियम असते. भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्यामुळे स्नायू व हाडे सुद्धा निरोगी आणि सुदृढ राहतात.
5.भरपूर प्रमाणात पोषक तत्वे:
चिया सीड्स मध्ये प्रचुर प्रमाणात पोषक तत्वे आढळतात. यामध्ये आढळणारी पोषक तत्वे खालील प्रमाणे आहेत –
- लोह
- मॅग्नेशियम
- कॅल्शियम
- तांबे
- फॉस्फरस
- सेलेनियम
तसेच यामध्ये अल्फा-लिनोलिक ऍसिड आहे जे ओमेगा फॅटी ऍसिडस् चे प्रमाण मेंटेन करते. तुम्हाला वेगवेगळ्या रोगांच्या धोक्यापासून वाचवते जसे कि कॅन्सर, हृदयाचे रोग आणि सूज येणाऱ्या परिस्थिती.
चिया सीड्स चे सेवन कसे करावे:
वेगवेगळ्या आणि चविष्ट पद्धतीने यांचे सेवन करता येऊ शकते. तुम्ही साध सरळ पाण्यात मिक्स करून पिऊ शकता. किंवा तुम्ही मिल्क शेक पिणे पसंद करत असाल तर त्यात मिक्स करून पिऊ शकता. इतर बऱ्याच प्रकारे जस कि ओट्स शिजवून त्यात वरून टाकून खाऊ शकता. जस तूम्हाला आवडेल तस खाऊ शकता फक्त एकच काळजी घ्या कि या बिया खाल्यानंतर दिवसभरात भरपूर पाणी प्या ज्यामुळे डिहाड्रेशन नाही होणार.