भारताच्या थेट विक्री उद्योगामध्ये १२ % वाढ, पार केला २१००० करोड चा टर्नओव्हर

Spectacular growth in Indian Direct Selling Industry

Growth of Indian Direct Selling Industry: इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन(IDSA-Indian Direct Selling Association) ने केलेल्या सर्वे नुसार भारताच्या थेट विक्री उद्योगामध्ये १२ % वाढ झाली आहे. या उद्योगाने एक नवीन विक्रम केलाय ज्यामध्ये गेल्या ४ वर्षाचा चक्रवाढ वार्षिक वाढ(CAGR) दर ८.३ % झाला आहे.

२०२२-२३ ची एकूण उद्योग उलाढाल हि साधारण २१२८२ करोड इतकी नोंदण्यात आली आहे. २०२१-२२ च्या तुलनेत एकूण विक्री हि साधारण २२५२ करोड ने वाढली आहे. जो एक खूप मोठा आकडा आहे. आणि खूपच उल्लेखनीय वाढ या उद्योगात झाली आहे.

या उद्योगात प्रामुख्याने निरोगी राहण्यासाठीची आणि पौष्टिक आहार जो आपल्या शरीराला आवश्यक आहे त्याचाशी निगडित उत्पादने विकली जातात. ज्याला आपण वेलनेस आणि न्यूट्रीशनल प्रॉडक्ट्स असेही ओळखतो. तसेच कॉस्मेटिक आणि पर्सनल केअरशी संबंधित उत्पादनेही विकली जातात. या उद्योगामध्ये एवोन, मोडीकेअर, अँमवे आणि ओरिफ्लेम या कंपन्या आघाडीवर आहेत. वेलनेस आणि न्यूट्रीशनल प्रॉडक्ट्सचे एकूण उद्योग उलाढालीत ७३.५ % च योगदान आहे. तर पर्सनल केअर उत्पादनांनी ११.३% च योगदान दिल आहे.


थेट विक्री उद्योग (Direct Selling) म्हणजे काय ? आणि तो कसा चालतो?

या उद्योगात प्रामुख्याने थेट रिटेल विक्रीला भर असतो. ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला थेट उत्पादन किंवा वस्तू विकते जो या उत्पादनाचा वापर स्वतः करत असतो. ज्याला आपण मुख्य ग्राहक असही म्हणू शकतो. या उद्योगात काम करण्यासाठी खूप काही शिक्षण किंवा बुद्धिमत्ता असावी अस काही बंधन नाही व यामध्ये तुम्ही सहज प्रवेश करू शकता, त्या कंपनीचे उत्पादन विकत घेऊन.

दुसरा याचा फायदा असा होतो कि त्या कंपीनीचा जाहिरात करण्यासाठी जो अमाप खर्च होतो तो वाचतो आणि तोच पैसा कंपनी डिविडेंड किंवा फायद्याचा हिस्सा म्हणून त्या कंपनीच्या मेम्बर्सना, त्यांनी केलेल्या विक्रीच्या मोबदल्यात वाटून टाकते. आणि बाकीचा पैसा हा पुन्हा उत्पादने बनवण्यास वापरला जातो तसेच इतर बऱ्याच समाजउपयोगी कारणास दान ही केला जातो. यामुळे सर्वांगीण फायदा होऊन राष्ट्राच्या विकासास मदत होते.


Leave a Comment