Site icon Maharajya Times

गौरव मोरे ने केले महाराष्ट्राची हास्यजत्रेला बाय बाय! पोस्ट शेयर करत घेतला भावुक निरोप

Gaurav More quits Maharashtrachi Hasyajatra, shared emotional post on Instagram:

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठीवर गाजलेला एक अत्यंत मनोरंजक कार्यक्रम आहे. यामध्ये बरेच कलाकार काम करत आहेत. अनेकांनी आपल्या अभिनयाचा प्रवास इथूनच सुरु केला त्यापैकी एक म्हणजे वन अँड ओन्ली गौरव मोरे. गेली बरेच वर्षे तो या कार्यक्रमात काम करत होता. आणि लोकांना अगदी पोट दुखेपर्यंत त्याने हसवलं. पण आता तो महाराष्ट्राची हास्य जत्रा ऑफिसिअली सोडत आहे. तसे त्याने एक पोस्ट हि इंस्टाग्राम वर शेयर केले आहे.

Gaurav More emotionally quits Maharashtrachi Hasyajatra

पोस्ट शेयर करताना त्याने आपला नेहमीच अंदाज वापरला आणि आपले इंट्रोडक्शन दिले आहे जे आपल्या सर्वानाच माहित आहे. जे असे आहे, “हॅलो एव्हरीवण आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टा ना ना ना ना नाआ…..” पोस्ट मध्ये लिहिलेला भावुक मजकूर,

आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची……☺️

रसिक प्रेक्षक आपण हया साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत..
मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधुन आपला निरोप घेत आहे.
माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो.
महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे❤️

Gaurav More (Instagram profile : im_gaurav_more2)

सध्या (Gaurav More) गौरव मोरे कोणत्या शो मध्ये काम करतो?

सध्या गौरव मोरे सोनी टीव्हीवरील हिंदी कार्यक्रमात काम करत आहे ज्याचे नाव “मॅडनेस मचाऐंगे” असं आहे. घोषणा झाल्यापासूनच हा कार्यक्रम खूप चर्चेत आहे. या शो मध्ये तो हेमांगी कवी व कुशल बद्रिके सोबत काम करत आहे.

यापूर्वी, दुखापतीमुळे गौरवला लोकप्रिय मराठी कॉमेडी शो महाराष्ट्राची हस्या जत्रामधून रजा घ्यावी लागली होती. तो गेल्यानंतर लगेचच तो कायमचा निघून गेल्याच्या अफवा पसरल्या. नंतर, त्याने स्पष्ट केले की तो शो कायमचा सोडत नाही. पण आता इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर केल्यामुळे स्पष्ट झालाय कि त्याने महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडली आहे.

त्याने पोस्ट शेयर केल्या नंतर त्याचा बऱ्याच फॅन्सनी त्याला भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही लोकांनी दुःख व्यक्त केले आहे कि, “तू या कार्यक्रमात नसशील तर मजा नाही.” वगैरे कमेंट्स त्याचा फॅन्सनी टाकल्या आहेत. सोबतच त्यांचे आधीचे सहकलाकार जसे पृथ्वीक प्रताप, प्रिया इंदलकर आणि समीर चौघुले यांनी कमेंट करून त्याला शुभेच्छा देऊन प्रेम व्यक्त केले आहे.


Exit mobile version