CBSE बोर्ड 2024 च्या निकालाची तारीख झाली जाहीर. इयत्ता 10 वी, 12 वीचा निकाल 20 मे नंतर होण्याची शक्यता

CBSE Board 2024 Results are expected post May 20th:CBSE इयत्ता 10 वी 2024 चा निकालआणि CBSE इयत्ता 12 वी चा 2024 निकाल लवकरच जाहीर केला जाईल. इयत्ता 10वी आणि 12वी चे निकाल एकाच दिवशी जाहीर होणे अपेक्षित आहे. CBSE अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात असे सांगण्यात आले कि, 10 वी आणि 12 वी या दोन्ही वर्गांच्या निकालांचे प्रकाशन हे साधारण 20 मे नंतर केले जाईल.


बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in द्वारे ही सूचना दिली आहे कि, “दहावी आणि बारावीचे CBSE बोर्डाचे निकाल 20 मे 2024 नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.” CBSE इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी 2024 चा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in वर देखील प्रकाशित केला जाईल. 39 लाखांहून अधिक उमेदवार CBSE इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या निकालांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

याशिवाय, digilocker.gov.in आणि results.gov.in सारखे प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा निकाल सोयीस्करपणे व सहजपणे तपासण्यासाठी पर्यायी चॅनेल ऑफर करतात.

निकालाच्या घोषणेवर अपडेट राहण्यासाठी, विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट आणि त्याच्या सोशल मीडियावर वारंवार लक्ष ठेवण्याची आहे. CBSE इयत्ता 10वी च्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या दरम्यान घेण्यात आल्या, तर 12वी च्या परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरू होऊन, 2 एप्रिलला पूर्ण झाल्या.


CBSE 10वी, 12वी 2024 चा निकाल (CBSE Board 2024 Results) अधिकृत वेबसाईटवर कसा चेक करायचा ?

CBSE 10वी आणि 12वीचे निकाल 2024 च्या अधिकृत वेबसाइटवर तपासण्यासाठी, विद्यार्थी खालील सोप्प्या प्रक्रियेचे अनुसरण करू शकतात :

  • स्टेप 1 : CBSE च्या results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • स्टेप 2 : “Results” विभागावर नेव्हिगेट करा.
  • स्टेप 3 : येथे इयत्ता 10 वी आणि 12 वी 2024 च्या निकालांसाठी स्वतंत्र लिंक मिळतील.
  • स्टेप 4 : संबंधित लिंकवर क्लिक करून, तुम्हाला एका नवीन पेजवर निर्देशित केले जाईल. जेथे तुम्हाला आवश्यक तपशील जसे की त्यांचा रोल नंबर, केंद्र क्रमांक, शाळा क्रमांक आणि जन्मतारीख एंटर करणे आवश्यक आहे.
  • स्टेप 5 : आवश्यक माहिती भरल्यानंतर , विद्यार्थ्यांनी ” Submit ” किंवा ” Check Results ” बटणावर क्लिक करावे.
  • स्टेप 6 : त्यानंतर, भरलेल्या तपशीलांसाठी CBSE 10 वी किंवा 12 वी 2024 चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.
  • स्टेप 7 : त्यानंतर विद्यार्थी त्यांचे निकाल डाउनलोड किंवा प्रिंट करू शकतात.


CBSE बोर्ड 2024 चा (CBSE Board 2024 Results) निकाल (Digi Locker) डिजीलॉकर ॲपवर कसा तपासायचा ?

तुम्ही खालील स्टेप्स प्रमाणे डिजिलॉकर ॲपवर किंवा वेबसाइट वर तुमचा निकाल पाहू शकता:

  • स्टेप 1 : Digi Locker ॲप ओपन करा किंवा Digi Locker वेबसाइटला भेट द्या.
  • स्टेप 2 : तुमच्या अकॉउंट मध्ये साइन इन करा. तुमच्याकडे अकॉउंट नसल्यास, तुम्ही ते तयार करू शकता.
  • स्टेप 3 : एकदा लॉग इन केल्यानंतर, कॅटेगरी मध्ये CBSE विभागात नेव्हिगेट करा किंवा मुख्यपृष्ठावर CBSE निकाल लिंक शोधा.
  • स्टेप 4 : आवश्यक माहिती भरा जसे कि जन्म तारीख आणि रोल नंबर.
  • स्टेप 5 : आवश्यक माहिती भरल्यानंतर, आपले मार्क्स तपासण्यासाठी पुढे जा.
  • स्टेप 6 : तुमचा CBSE बोर्ड 10 वी किंवा 12वी 2024 चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • स्टेप 7 : तुमच्याकडे निकाल डाउनलोड करण्याचा किंवा सेव्ह करण्याचा पर्याय आहे. भविष्यातील संदर्भासाठी याचा उपयोग होईल.


Leave a Comment