Site icon Maharajya Times

CBSE बोर्ड 2024 च्या निकालाची तारीख झाली जाहीर. इयत्ता 10 वी, 12 वीचा निकाल 20 मे नंतर होण्याची शक्यता

CBSE Board 2024 Results are expected post May 20th:CBSE इयत्ता 10 वी 2024 चा निकालआणि CBSE इयत्ता 12 वी चा 2024 निकाल लवकरच जाहीर केला जाईल. इयत्ता 10वी आणि 12वी चे निकाल एकाच दिवशी जाहीर होणे अपेक्षित आहे. CBSE अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात असे सांगण्यात आले कि, 10 वी आणि 12 वी या दोन्ही वर्गांच्या निकालांचे प्रकाशन हे साधारण 20 मे नंतर केले जाईल.


बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in द्वारे ही सूचना दिली आहे कि, “दहावी आणि बारावीचे CBSE बोर्डाचे निकाल 20 मे 2024 नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.” CBSE इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी 2024 चा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in वर देखील प्रकाशित केला जाईल. 39 लाखांहून अधिक उमेदवार CBSE इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या निकालांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

याशिवाय, digilocker.gov.in आणि results.gov.in सारखे प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा निकाल सोयीस्करपणे व सहजपणे तपासण्यासाठी पर्यायी चॅनेल ऑफर करतात.

निकालाच्या घोषणेवर अपडेट राहण्यासाठी, विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट आणि त्याच्या सोशल मीडियावर वारंवार लक्ष ठेवण्याची आहे. CBSE इयत्ता 10वी च्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या दरम्यान घेण्यात आल्या, तर 12वी च्या परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरू होऊन, 2 एप्रिलला पूर्ण झाल्या.


CBSE 10वी, 12वी 2024 चा निकाल (CBSE Board 2024 Results) अधिकृत वेबसाईटवर कसा चेक करायचा ?

CBSE 10वी आणि 12वीचे निकाल 2024 च्या अधिकृत वेबसाइटवर तपासण्यासाठी, विद्यार्थी खालील सोप्प्या प्रक्रियेचे अनुसरण करू शकतात :


CBSE बोर्ड 2024 चा (CBSE Board 2024 Results) निकाल (Digi Locker) डिजीलॉकर ॲपवर कसा तपासायचा ?

तुम्ही खालील स्टेप्स प्रमाणे डिजिलॉकर ॲपवर किंवा वेबसाइट वर तुमचा निकाल पाहू शकता:


Exit mobile version