निरोगी जीवनशैलीसाठी 6 आवश्यक टिप्स, जरूर ट्राय करा आणि अनुभवा तुमच्या आयुष्यात बदल.

6 Essential Tips for a Healthy Lifestyle that you all must try:

आजकालच्या जीवनात शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे खूप गरजेचे आहे. सध्या जास्त वेळ बसून काम करणे, नेहमीच्या कामाच्या वेळेच्या बाहेर पण काम करत राहणे यासारख्या जीवनशैली मुळे बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या आजारांना व मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

आपल्या दैनंदिन आयुष्यात निवडक बदल घडवून आणि चांगल्या सवयी अंगी बाळगून आपण एक हेल्थी लाईफस्टाईल जगू शकतो. आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या व दीर्घकाळ कामाचे तास यामुळे स्वतःसाठी वेळ काढून काही करणे थोडे अशक्यप्राय होते. पण हळू हळू निरोगी राहण्याच्या सवयी लावून घेतल्या आणि त्यासाठी थोडा थोडा वेळ जरी काढला तरी एक मोठा बदल आपल्या आयुष्यात घडू शकतो. संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम आणि तणावाचे व्यवस्थापन करणे, आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे असे आणि यासारखे अनेक मार्ग आहेत. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विविध रोगांचा धोका कमी करण्यासाठी येथे काही टिप्स आम्ही तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत.


6 Essential Tips for a Healthy Lifestyle

Live a Healthy Lifestyle!!

निरोगी जीवनशैलीसाठी 6 आवश्यक टिप्स खालील प्रमाणे:


1. पुरेशी झोप घेणे:

कमीतकमी 7-8 तास झोपणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीराला योग्य आराम भेटून आपले शरीर पुन्हा कार्य करण्यासाठी रिफ्रेश होते. सध्या मोबाईल फोन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्यामुळे निरोगी जीवनशैली अवलंबणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे हा मोबाईल चा अति वापर घातक समजून झोपायच्या वेळी तो लांबच ठेवणे खूप गरजेचे आहे.


2. ध्यान आणि व्यायाम:

ध्यान क्रियेचा सराव केल्यामुळे आत्मिक शांती भेटून तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढते. तणाव कमी होतो.
तसेच आपल्या रोज़च्या कामाच्या दिनचर्येत थोडा वेळ बाजूला काढून आपल्याला आवडेल आणि शरीराला झेपेल असा व्यायाम सुरु करणे फायदेशीर ठरेल. यामध्ये योग, पोहणे, एखादा मैदानी खेळ खेळणे किंवा जिम मध्ये जाऊन वेटलिफ्टिंग सारखे व्यायाम करणे. आता एक नवीन प्रकार म्हणजे झुंबा ज्यात तुम्ही डान्स करून शरीराचा व्यायाम हि करू शकता. तर असा एखादा जरी व्यायाम आपण निवडून तो करायला चालू केला तर नक्की शारीरिक व मानसिक फायदा होऊ शकतो.


3. साखर खाणे टाळा:

आता साखरेचा धोका लहान मुलांना सुद्धा कळायला लागला आहे. कारण आता सोसिअल मीडिया वरती म्हणजेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर त्या बद्दल जागृती निर्माण केली जात आहे. आणि नक्कीच साखरेचा वापर टाळून आपण जर पारंपरिक शेंद्रीय गूळ खान्यास चालू केला तर आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर ठरेल. व आपले वजन हि आटोक्यात राहण्यास मदत होईल.


4. हायड्रेटेड राहणे:

हायड्रेटेड राहणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. तुमचे शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पियुन शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. सध्याच्या उष्णतेच्या लाटेची स्थिती पाहता, 2 ते 3 लिटर पाणी पिणे योग्य आहे.


5. सोडा व एरिएटेड ड्रिंक्स पिणे कमी करा:

कडक उन्हाळ्यात नेहमीच खूप तहान लागते. पण हि तहान भागवण्यासाठी रस्त्याच्या कडेला मिळणारे एरेटेड ड्रिंक्स पिण्याऐवजी निंबू पाणी, लस्सी, शिकंजी, नारळपाणी आणि साखर ना घालता ताजे रस पिणे कधीही चांगले व निरोगी ठरेल. ही पेये शरीराला निरोगी ठेवणारी पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात देतात.


6. आरोग्यदायी स्नॅक्सचे सेवन करणे:

मैद्याची बिस्किटे ,तेलकट फरसाण खाण्याऐवजी घरी बनवलेले भिजवलेल्या कडधान्याचे सॅलड, मखाना, नाचणीचे बेक केलेले स्नॅक्स, किंवा ज्वारीचे चिरमुरे असे हेल्थी अन्नपदार्थ आपण खणायसा निवडू शकतो. ज्यामुळे आपल्या भरपूर फायबर, प्रथिने आणि पोषकतत्वे मिळू शकतील.


Stay Fit and have a Healthy Lifestyle!!!

Leave a Comment