Site icon Maharajya Times

जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस 2004, ऑटिझम बद्दल जाणून घेऊया आणि बदल घडवूया !

World Autism Awareness Day 2024

Information about World Autism Awareness Day 2024:

दरवर्षी २ एप्रिल या दिवशी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस हा साजरा केला जातो. २००७ मध्ये युनाइटेड नेशन्स असेम्बलीने हा दिवस ऑटिझम च्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून घोषित केला.


ऑटिझम म्हणजे काय ?

ऑटिझम, किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) म्हणजे भाषण किंवा गैर मौखिक संभाषण, समाजामध्ये वावरण्याची क्षमता, पुन्हा पुन्हा तेच वागणे यासंबंधित विकार होय. आज युनायटेड स्टेट्समधील अंदाजे 36 मुलांपैकी 1 आणि 45 पैकी 1 प्रौढांना ऑटिझम होतो असा रोग नियंत्रण केंद्राचा अहवाल सांगतो.


ऑटिझमची होण्याची कारणे:

अत्यंत अकाली जन्म होणे किंवा जन्मानंतर खूप कमी वजन असणे. बाळाच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे जन्माला येणारी कोणतीही अडचण. गर्भधारणेच्या वेळी आलेला लठ्ठपणा, मधुमेह किंवा रोग प्रतिकार शक्तीशी निगडित विकार. वायू प्रदूषण किंवा काही कीटकनाशकांचा जन्मपूर्व संपर्क होणे या अशा बऱ्याच कारणांमुळे हा विकार होण्याची शक्यता असते.


ऑटिझम होण्याशी निगडित धोके:

शास्त्रज्ञ या बाबती अजूनही संशोधन करत आहेत. पण साधारण हा विकार होण्याचे धोके खालील प्रमाणे आहेत:


ऑटिझमची लक्षणे:


ऑटिझम वरील उपचार:

यांचावरील उपचारामध्ये वेग वेगळ्या थेरपीचा उपयोग केला जातो. यामध्ये वागणूक आणि बोलणे सुधारण्यासाठी थेरपी दिली जाते. काहीवेळा ऑटिझमशी संबंधित कोणत्याही वैद्यकीय परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यात मदत करण्यासाठी औषधे वापरली जातात.


जागतिक ऑटिझम जागरूकता दिवसाची थीम:

संयुक्त राष्ट्राने या वर्षी ठरवलेली थीम आहे ,” जगण्यापासून समृद्धीकडे जाणे: ऑटिस्टिक व्यक्ती प्रादेशिक दृष्टिकोन शेयर करतात “

अधिक माहिती साठी क्लिक करा https://www.un.org/en/observances/autism-day


भारतात ऑटिझमचा प्रसार:

ईटी हेल्थ वर्ल्ड ने २०२३ मध्ये तयार केलेल्या अहवालानुसार साधारण १८ मिलियन लोकांना या विकाराचे निदान झाले आहे. २ ते ९ वयोगटातील साधारण १ ते १.५ टक्के मुलांना या विकाराच निदान झालेलं आहे. चला याबद्दल जागरूक हॊउया आणि बदल घडवूया.


Exit mobile version