टाटा मोटर्स आपल्या ऑटो विभागाचे, कार आणि व्यावसायिक वाहन अशा स्वतंत्र युनिट्समध्ये विभाजन करत आहे.


भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह टाटा ग्रूप यांनी त्यांच्या ऑटोमोबाईल डिव्हिजनचे दोन वेगळ्या युनिटसमध्ये रूपांतर करण्याचे ठरवले आहे. कमर्शियल व्हीकल CV(commercial vehicle) ला पॅसेंजर व्हीकल PV(passenger vehicle) युनिटपासून वेगळं केलं जाणार आहे. ज्यामध्ये जॅग्वार लँड रोव्हर JLR(Jaguar Land Rover) चाहि समावेश असेल.

कंपनीच्या बोर्डाने टाटा मोटर्सचा व्यवसाय दोन वेगळ्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एक युनिट व्यावसायिक वाहन ऑपरेशन्स CV आणि संबंधित गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करेल, तर दुसरी कंपनी PV, इलेक्ट्रिक वाहन EV (Electric Vehicles), JLR आणि संबंधित गुंतवणुकींचा समावेश असलेल्या प्रवासी वाहन ऑपरेशन्सवर देखरेख करेल.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) व्यवस्थेच्या योजनेद्वारे डिमर्जर पुढे जाईल, सर्व TML (Tata Motors Limited) शेयरहोल्डर्सना खात्रीशीरपणे दोन्ही युनिट्समध्ये समान शेअरहोल्डिंग राखले जाईल.

टाटा मोटर्सने यासंबंधित पुष्टी दिली की डिमर्जरचा कर्मचारी, ग्राहक किंवा व्यावसायिक भागीदारांवर कोणताही परिणाम होणार नाही.

चेयरमन एन चंद्रशेखरण यांनी सांगितले कि,

टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत जोरदार टर्नअराउंड केले आहे. तीन ऑटोमोटिव्ह व्यवसाय युनिट्स आता स्वतंत्रपणे कार्यरत आहेत आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. हे डिमर्जर त्यांना लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि चपळतेने बाजाराद्वारे प्रदान केलेल्या संधींचा चांगला फायदा घेण्यास मदत करेल. यामुळे आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळेल, आमच्या कर्मचाऱ्यांची प्रगती होईल आणि आमच्या शेयरहोल्डर्सना फायदेशीर ठरेल

टाटा सन्सच्या बोर्डाचे चेयरमन एन चंद्रशेखरण

Sharekhan नावाच्या ब्रोकरेज फर्म चे डेप्युटी व्हीपी अभिषेक गावशिंदे यांनी टाटा मोटर्सच्या या डीमर्जर बद्दल आपल मत व्यक्त केले आहे. एकूणच ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये, टाटा मोटर्स ही गावशिंदेची सर्वोच्च निवड आहे.

“टाटा मोटर्सचे व्यावसायिक वाहनामध्ये (सीव्ही) व्हॉल्यूम ते मार्जिनमध्ये बदलणे चांगले आहे,”

डेप्युटी व्हीपी Sharekhan

आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या सहामाहीत टाटा मोटर्सची कामगिरी पहिल्या सहामाहीपेक्षा जास्त होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.


Leave a Comment