Site icon Maharajya Times

स्वातंत्र्य वीर सावरकर : रणदीप हुंडा साकारतोय सावरकरांची भूमिका

रणदीप हुंडा दिग्दर्शित चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला. २२ मार्च ला होणार रिलीज. हा चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाच व्यक्तिमत्व. म्हणूनच त्यांना वीर सावरकर असं हि ओळखल जात.

सावरकरांच्या कार्याबद्दल खूपच प्रभावीपणे मांडणी करण्यात आली आहे या चित्रपटात असं ट्रेलर बघून तर जाणवत आहे. यूट्यूब वर या चित्रपटाच्या ट्रेलर ला एका दिवसात १.३ मिलियन व्युव्हज आले आहेत. याच्या वरूनच लक्षात येतंय कि प्रेक्षक किती उत्सुक आहेत हा चित्रपट बघायला.

या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका स्वतः रणदीप हुडाच साकारत आहे. आणि या भूमिकेत तो अगदी हुबेहूब सावरकरच वाटत आहे आणि त्याच्या एक्टिंग च्या कौशल्याने भूमिकेला पूर्णपणे न्याय देतोय. नक्कीच चित्रपट बघण्या सारखा आहे अस ट्रेलर वरून आपण अंदाज बांधू शकतो.

रणदीप हुंडा सोबत अंकिता लोखंडे, अमित सियाल, अपिंदरदीप सिंघ आणि बरेच कलाकार आहेत. या चित्रपटाच लेखन हे रणदीप हुंडा आणि उत्कर्ष नैथानी यांनी केलं आहे.

झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, रणदीप हुड्डा आणि योगेश रहार निर्मित. रुपा पंडित, सॅम खान, अन्वर अली आणि पांचाली चक्रवर्ती हे सहनिर्माते आहेत. रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


रणदीप हुंडाने या बाबतीत एक मराठी मध्ये पोस्ट हि टाकली आहे त्याच्या X ऑफिसिअल हॅण्डलवर. कॅप्शन मध्ये खालील प्रमाणे लिहिल आहे.

घेतला ज्यांनी वसा अखंड भारताचा,

मोठ्या पडद्यावर सादर होणार इतिहास त्या ‘वीर’ व्यक्तिमत्त्वाचा !

स्वातंत्र्य लढ्याचा धगधगता इतिहास पुन्हा ज्वलंत करायला  येत आहे

#SwatantryaVeerSavarkar, २२ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित.

निर्माते आनंद पंडित या बाबतीत म्हणाले कि, “मला वीर सावरकर आणि त्यांच्या जीवनातून खूप प्रेरणा मिळाली आहे. त्यांची भारतासाठी आदर्शवादी दृष्टी होती आणि आमच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान मोठे आहे. हा चित्रपट देशातील तरुणांना माझी भेट आहे.

निर्माते संदीप सिंह म्हणाले, “विनायक दामोदर सावरकर हे खरे देशभक्त होते. मात्र त्यांचा बाबतीत नेहमी गैरसमज होत आले आहेत. वीर सावरकरांच्या ब्रिटिशांना वेठीस धरण्याच्या बंडखोर पद्धतींमुळे लोकांना ते दहशतवादी असल्याचा विश्वास वाटू लागला. त्यांनी हा चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या चुकीच्या समजुतीला पूर्णविराम दिला जाईल. या चित्रपटामुळे सावरकरांना सर्व वस्तुस्थिती माहितीसह एका नव्या प्रकाशात पाहायला मिळेल. इतिहास दुरुस्त करता येत नाही आणि भूतकाळात घडलेल्या घटना बदलता येत नाहीत. आपल्या काळातील आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकावर चित्रपट बनवण्याची संधी मिळाली त्यासाठी मी कृतज्ञ आहे.


Exit mobile version