भारतातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिजचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

Sudarshan Setu Inauguration:

25 फेब्रुवारीला पंत प्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुदर्शन सेतुचे उदघाटन झाले, जो भारतातील सगळ्यात लांब केबल स्टेड ब्रिज आहे. ज्याला पूर्वी ‘सिग्नेचर ब्रिज’ म्हणून पण ओळखल जायच. हा ब्रिज गुजरात मधील द्वारकेतील ओखापासून बेयत पर्यंत बांधण्यात आला आहे. त्याची लांबी साधारण 2.32 KM इतकी आहे. या कार्यक्रमासाठी गुजरात चे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते.

Sudarshan Setu

ओखापोर्टच्या जवळ साधारण 30 KM च्या अंतरावर द्वारका बेट आहे. हा ब्रिज बांधल्यामुळे आता वाहतुक करणे अगदी सोयीस्कर झाल आहे. पूर्वी भक्तांना द्वारकाधीश मंदिरात जाण्यासाठी बोट मार्गाचा वापर करावा लागत होता पण आता ब्रिजमुळे हे अगदी सोप्पं झाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये सुरू केलेल्या सुदर्शन सेतुच्या बांधकामाला जुन्या आणि नवीन द्वारकाला जोडण्याच्या भूमिकेसाठी अधोरेखित करण्यात आले आहे.

ब्रिजच उदघाटन झाल्या नंतर द्वारकाधीश मंदिराचे पंडाजी धरम ठकर यांनी ANI न्यूज एजन्सीला सांगितले कि, ” येथील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर उपाय हा सुदर्शन सेतु आहे. द्वारकेचाही ‘विकसित भारत’मध्ये समावेश करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला होता. यासाठी आम्ही पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो.”

सुदर्शन सेतुचे डिजाईन हे इतके आकर्षक आणि मनमोहक आहे. ब्रिज च्या फूटपाथवर दोन्ही बाजूला श्री कृष्णाची प्रतिमा आणि भगवत गीते मधील श्लोक यांनी सुशोभित करण्यात आले आहे. या ब्रिजवर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवण्यात आले आहेत. जे एक विशेष फिचर आहे. ज्यामध्ये १ मेगावॅट ची वीज निर्माण करण्याची क्षमता आहे.

अजून एक पुजारी जिग्नेश जोशी यांनी ANI ला सांगीतल कि, “सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे जो पूल खुला होणार आहे तो ‘सुदर्शन’ देवाच्या नावाने आहे. हे सर्वांच्या लक्षात राहील. आम्ही सर्व मोदीजींचे आभारी आहोत. आपला आनंद शब्दात सांगताही येत नाही. सर्व पुरोहितांकडून पंतप्रधान मोदींना खूप खूप शुभेच्छा.”

हा ब्रिज फक्त भक्तांना वाहतुकीसाठी सोयीस्कर नसून तो एक टुरिस्ट स्पॉट म्हणून पण प्रसिद्धीस पावेल हे नक्की. गुजरातच्या समृद्ध सांस्कृतिक वारस्यात एक नवीन भर पडली आहे आणि गुजरात हे प्रगतीच्या नवीन वाटांवर प्रदार्पण करत आहे.

Leave a Comment