दिगपाल लांजेकर यांनी हा चित्रपट दिगदर्शित केला आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी चित्रपट काढून दिगपाल लांजेकरांनी मराठी जनतेला पुन्हा एकदा शिवरायांच्या पराक्रमाची नवी ओळख करून दिली आहे. “शिवरायांचा छावा” हा चित्रपट शिवराज अष्टकाचा भाग नसला तरी नक्कीच यात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किती रोमांचक रित्या दाखवला जाईल या बद्दल लोकांना उत्सुकता आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलर ला ३ मिलियन पेक्षा जास्त व्युस आले आहेत यूट्यूबवर. त्याबद्दल दिगपाल लांजेकर यांनी त्यांचा इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट सुद्धा केले आहे-
चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे अभिनेता भूषण पाटील. भूषण ने “ओळख माय आयडेंटिटी” (Olakh My Identity) या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टी मध्ये पदार्पण केले. भूषण पाटील सोबत तृप्ती तोरडमल, लोकप्रिय अभिनेत्री मृणाली कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, विक्रम गायकवाड, रवी काळे, अभिजित श्वेतचंद्र आणि बॉलिवूड मधला अभिनेता रवी देव सुद्धा दिसणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बहादूर खानाला बुऱ्हाणपूर चा सुभेदार घोषित करतो. जो क्रूरपणे जनतेला छळत असतो,लोकांवर जिझिया कर लावतो. याची प्रतिक्रिया म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर शहरावर छापे टाकून लोकांना अन्यायी राजवटीपासून वाचवले. याविषयी मुख्यत्वे दाखविले जाणार आहे.
आत्ता पर्यंत प्रदर्शित झालेल्या पोस्टरला आणि ट्रेलर ला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला आहे. सोसिअल मीडियावर सुद्धा चित्रपटाची चर्चा खूप ट्रेंडवर आहे.
करोडो मराठी जनतेच्या हृदय स्थानी असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी सुपुत्राची विजयगाथा म्हणजे अंगावर रोमांच उभे करणारे काव्यच जणू. बघूया आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर लोकांच्या किती पसंदीस पडतो ते..