RBI ने Paytm Payments Bank वरिल कारवाईबद्दल स्पष्टीकरण दिले: Persistent non-compliance मुळेच केली कारवाई

Paytm Payments Bank

आज गुरुवारी, Reserve Bank of India ने सांगितले की Paytm विरुद्धची कारवाई ही नियमांचे पालन करण्यात सतत अपयशी ठरल्याचा परिणाम आहे.

“आम्ही सर्व संस्थांना अनुपालनासाठी पुरेसा वेळ देतो, काही वेळा पुरेशा पेक्षाही जास्त. जर त्यांनी पालन केले तर आमच्यासारख्या नियामकाने कारवाई करण्याची गरज का पडेल?” RBI Governor Shaktikanta Das यांनी monetary policy समितीच्या भाषणानंतर ब्रीफिंग दरम्यान सांगितले.

“सतत गैर-अनुपालनासाठी (persistent non-compliance) नियमन केलेल्या संस्थेविरुद्ध ही एक पर्यवेक्षी कारवाई आहे. भविष्यात आवश्यक असल्यास central bank योग्य पावले उचलेल,” असे deputy governor Swaminathan J यांनी टिप्पणी केली.

RBI FAQ चा संच (वारंवार विचारले जाणारे प्रश्न-frequently asked questions) पुढील आठवड्यात Paytm च्या कारवाईमुळे उद्भवणाऱ्या सार्वजनिक चिंतेचे निराकरण करण्यासाठी जारी करेल,” Shaktikanta Das यांनी जाहीर केले.

Central bank ने अलीकडेच Paytm Payments Bank ला 29 February पासून नवीन ठेवी स्वीकारण्यास मनाई केली होती. “कोणतेही व्याज, कॅशबॅक किंवा परताव्याशिवाय, 29 February 2024 नंतर कोणत्याही ग्राहकांच्या खाती,prepaid instruments, wallet, FASTags, NCMC card इत्यादींमध्ये कोणत्याही अतिरिक्त ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा top-up ना परवानगी दिली जाणार नाही,” Central Bank ने सांगितले.

या शिवाय RBI ने या गोष्टीवर जोर दिला आहे की, ग्राहकांना savings bank accounts, current accounts, prepaid instruments, FASTags , National Common Mobility card इत्यादींसह विविध खात्यांमधून पैसे काढण्याची किंवा त्यांची शिल्लक वापरण्याची परवानगी असेल कोणत्याही निर्बंधाशिवाय, जोपर्यंत त्यांची शिल्लक उपलब्ध आहे.

29 Frebruary नंतर, कंपनीला Digital Payment अखंडित चालू ठेवण्यासाठी तिची खाती third party banks कडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

Leave a Comment