Rajinikanth and Sajid Nadiadwala collaboration:
प्रतिभांच्या संमिश्रणाचे साक्षीदार होण्यासाठी तयार व्हा. रजनीकांत आणि बॉलीवूडचे हेवीवेट साजिद नाडियाडवाला पहिल्यांदाच एका रोमांचक नवीन चित्रपटाच्या प्रयत्नात एकत्र आले आहेत. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक नवीनच कुतूहल निर्माण झालं आहे.
नाडियाडवाला ग्रँडसन नावाच्या ओफिसिअल X (आधीचे ट्विटर ) हँडलवर या बाबतीत पोस्ट केली गेली आहे. ज्या मध्ये त्यांनी एक फोटो शेयर केला आहे, स्मायलींग पोस मध्ये रजनीकांत आणि साजिद नाडियाडवाला एकत्र दिसत आहेत. पोस्ट चं कॅप्शन इंग्रजीमध्ये आहे. ज्याचा अर्थ असा आहे कि : “दिग्गज रजनीकांत सरांसोबत काम करणे हा खरा सन्मान आहे! या अविस्मरणीय प्रवासाला एकत्र येण्याची तयारी करत असताना अपेक्षा वाढत आहे!”
It’s a true honour to collaborate with the legendary @rajinikanth Sir! Anticipation mounts as we prepare to embark on this unforgettable journey together!
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) February 27, 2024
– #SajidNadiadwala @WardaNadiadwala pic.twitter.com/pRtoBtTINs
साजिद नाडियाडवाला यांचे प्रभावी चित्रपट म्हणजे, अंजाना अंजानी, हे बेबी, 83, सत्यप्रेम की कथा, मुझसे शादी करोगी, हाऊसफुल आणि हिरोपंती. त्यासोबत सलमान खानने काम केलेला किक सुद्धा यांनीच दिगदर्शित केला आहे. अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटानं सोबत त्यांनी बाकी काही चित्रपटांमध्ये आपल्या लेखन कौशल्याची हि छाप पाडली आहे. त्यापैकी काही चित्रपट, हिरोपंती 2, हाऊसफुल 2 आणि मराठी चित्रपट लय भारी हे आहेत.
रजनीकांत लवकरच दिग्दर्शक लोकेश कनागराजसोबत त्याचा पुढचा प्रोजेक्ट सुरू करणार आहे, ज्याला थलायवर १७१ म्हणून ओळखले जात आहे. सध्या त्याच्या वेट्टय्यान (Vettaiyan) चित्रपटाचं शूटिंग जोरात सुरु आहे,जो जय भीम फेम दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित करत आहे. शेवटचं रजनीकांत ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित लाल सलाम(Lal Salam) या चित्रपटात मोईदीन भाईच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत होते.