Site icon Maharajya Times

पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यात रंगलेल्या चर्चेत , AI च्या फायदा तोट्यांवर झाली मत मांडणी

PM Modi reacted on AI during a conversation with Bill Gates

PM Modi reacted on AI during a conversation with Bill Gates:

लोकांना जर योग्य प्रशिक्षण नाही दिले गेले तर AI चा गैरवापर होऊ शकतो” असे पंतप्रधान मोदींनी बिल गेट्स यांना सांगितले. भारताच्या तंत्रज्ञान विकासा संबंधित बऱ्याच गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. यामध्ये शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा चा वापर कसा चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकेल यावरही भर देण्यात आला. या दरम्यान मोदींनी AI शी निगडित धोक्यांवरही चर्चा केली. ते असेही म्हणाले की जर लोकांनी एआयला जादूचे साधन म्हणून वापरले तर ते “गंभीर अन्याय ” करेल.

त्यांनी बिल गेट्स याना असेही सुचविले कि एआय ने तयार झालेल्या गोष्टींवर वॉटरमार्क चा वापर हा झालाच पाहिजे नाही तर भारतासारख्या देशात कोणीही डिपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करू शकेल. आणि यामुळे खूप नुकसान होऊ शकते.

इतकी चांगली गोष्ट (एआय) योग्य प्रशिक्षणाशिवाय एखाद्याला दिली तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. मी सुचवतो की आपण एआय-निर्मित सामग्रीवर स्पष्ट वॉटरमार्कसह सुरुवात केली पाहिजे जेणेकरून दिशाभूल होणार नाही. भारतासारख्या लोकशाही देशात , कोणीही डीपफेक वापरू शकतो,” त्यांनी बिल गेट्सला सांगितले.

डीपफेक सामग्री एआय जनरेटेड आहे हे मान्य करणे महत्त्वाचे आहे. सारासार विचार करून वागणे गरजेचे आहे” असेही त्यांनी सांगितले.

बऱ्याच सेलिब्रिटीज, खेळाडू, बॉलिवूड कलाकार आणि इत्तर नामांकित लोकांचे डिपफेक फोटो व व्हिडिओ वायरल झाल्यामुळे एआयच्या बाबतीत गैरवापर होण्याची संभावना वाढल्यामुळे मोदींनी यावर भाष्य करणे योग्य समजले. त्यांनी पुढे असेही सांगितले कि एआय च्या वापरामुळे मानवी कार्यक्षमता वाढली पाहिजे. व लोकांनी अळशीपणे त्याचा वापर करून चुकीच्या मार्गास जाता कामा नये.

जर आपण एआय चा जादूचे साधन म्हणून वापर केला, तर त्यामुळे कदाचित गंभीर अन्याय होईल. जर आळशीपणामुळे एआयवर अवलंबून राहिलो, तर तो चुकीचा मार्ग आहे. माझी ChatGPT शी स्पर्धा असावी आणि मी एआयच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आव्हान स्वीकारून,” ते व्यक्त झाले.

या वर बिल गेट्स यांनी आपले मत मांडले कि, ” हे एआयचे सुरुवातीचे दिवस आहेत. ते अशा गोष्टी करेल ज्या तुम्हाला कठीण वाटतात आणि नंतर ते काही करण्यात अपयशी ठरेल, जे तुम्हाला सोपे वाटते. असे दिसते की एआय ही एक मोठी संधी आहे, परंतु त्यासोबत काही आव्हाने आहेत“.

याबतीत अंततः ते बिल गेट्स यांना असेही बोलले कि, “ऐतिहासिकदृष्ट्या, पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीदरम्यान, आम्ही मागे पडलो कारण आम्ही एक कॉलोनी होतो ज्यामध्ये आमच्यावर परकीय सत्ता होती. डिजिटल एलिमेंट हा आता केंद्रस्थानी आहे जर आपण चौथ्या औद्योगिकचा विचार केला तर मला विश्वास आहे की भारत यामध्ये खूप काही मिळवेल.


सविस्तर संभाषण ऐकण्यासाठी पहा हा व्हिडीओ,

https://www.youtube.com/watch?v=idtZ_DsPWT8
Exit mobile version