Madhuri Dixit to Join Bhool Bhulaiyaa 3 along with Vidya Balan: विद्या बालन सोबत माधुरी दीक्षित सुध्दा काम करणार भूल भलैया ३ मध्ये

Bhool Bhulaiyaa 3 नवीन चित्त थरारक अनुभव घेऊन येत आहे.

आत्तापर्यंत या हॉरर कॉमेडी फ्रँचायझीचे 2 भाग रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांनी अनुक्रमे मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
कार्तिक आर्यनने आधीच घोषणा केली आहे आणि “ओजी मंजुलिका” विद्या बालनचे या थ्रीक्वलसाठी स्वागत केले आहे.
विद्या बालन या तिसऱ्या भागात सामील झाल्यानंतर, माधुरी दीक्षित देखील अनीस बज्मीच्या भूल भुलैया 3 च्या स्टार कास्टमध्ये सामील होत आहे.


Bhool Bhulaiyya 3: भूल भुलैया 3 बद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

2007 मध्ये आलेल्या ‘भूल भुलैया’ या हॉरर कॉमेडी सिनेमात मंजुलिकाची भूमिका साकारणारी विद्या बालन आता नव्या उत्साहाने फ्रँचायझीमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे.

कार्तिक आर्यनने त्याचा सोसिअल मीडिया हँडलवर लिहिले की, “And its happening. Og Manjulika is coming back to the world of BhoolBhulaiyaaSuper thrilled to welcome @balanvidya. This Diwali is going to be crackling #BhoolBhulaiyaa3 @aneesbazmee @tseries.official #BhushanKumar,”

कार्तिकने भुल भुलैय्या च्या पहिल्या भागातील विद्या बालनचे मंजुलिका या पात्राचे आणि त्याचे रुह बाबा या पात्राचे व्हिज्युअल्स दाखवणारा व्हिडिओ देखील पोस्ट केला सोसिअल मीडिया हँडलवर.

दुसऱ्या भागात तब्बू आणि कियारा अडवाणीसोबत कार्तिक आर्यन दिसला होता. या भागाचे दिग्दर्शन करणारे अनीस बज्मी तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन करणार आहेत. कार्तिक आर्यन विद्या बालन आणि माधुरी दीक्षित सोबत दिसणार आहे.


माधुरी दीक्षित भूल भुलैया ३ मध्ये सामील झाली:

एका सूत्राने सांगितले, “टीमला वाटले की कथेत आणखी एक चैतन्य वाढेल. जर, माधुरी आणि विद्याने ऍक्टिंग केलेल्या दोन भुते विरुद्ध रुह बाबा असा सामना असेल. दोन आघाडीच्या महिलांना पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र आणून निर्मात्यांनी ट्रम्प कार्ड खेळले आहे.”

स्रोत पुढे सांगतो, “चर्चा अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. अजून कशाचीही पुष्टी झालेली नाही.”

पुढील महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे.


Leave a Comment