Site icon Maharajya Times

आयफोन १६ प्लस नवीन रंगांमध्ये होणार लाँच, बाहेर पडलेल्या माहितींनुसार बॅटरी मध्ये सुद्धा होणार मोठा अपग्रेड

Iphone 16 plus हा नवीन रंगात दिसणार असल्याची माहिती लीक झाली आहे. वीबो वरील माहिती लीक करणाऱ्या फिक्स्ड फोकस डिजिटल यांचा दावा आहे कि नवीन लाँच होणारा आयफोन १६ प्लस काही नवीन कलर्स मध्ये मार्केट मध्ये आणला जाईल. या व्यतिरिक्त त्याच्या बॅटरी मध्ये सुद्धा मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

काही महिन्यानंतर नवीन आयफोन लाँच होणार असला तरी त्या बाबत आत्ताच खूप साऱ्या अफवा इन्टरनेट वर पसरत आहे. आता सगळण्याचं माहित आहे कि Apple हि कंपनी सप्टेंबर महिन्यात नवीन आयफोन लाँच करते किंवा अपग्रेडेड व्हर्जन येते. पण आयफोन हा इतका फेमस असल्यामुळे त्या बाबत आधीच चर्चा सुरु होते आणि अफवा पसरू लागतात.


नवीन Iphone 16 Plus संभावित कलर ऑपशन्स:

वीबो वर लीक झालेल्या माहितीनुसार यामध्ये जांभळा, गुलाबी, पिवळा, निळा, काळा, पांढरा आणि हिरवा रंगाचा ऑप्शन मिळण्याची संभावना आहे.

यापूर्वी X (पूर्वीचे ट्विटर) वरील टीप देणाऱ्या माजीन बु ने दिलेल्या माहितीनुसार आयफोन १६ प्रो हा कदाचित दोन नवीन रंग प्रकारात लाँच केला जाईल. त्यामध्ये डेझर्ट यलो (डेझर्ट टायटॅनियम) आणि सिमेंट ग्रे (टायटॅनियम ग्रे) असे नाव दिले जाऊ शकते.


आयफोन १६ प्लस ची बॅटरी:

विबो वर अजून लीक झालेल्या माहिती मध्ये बॅटरी अपग्रेड बद्दल सुद्धा चर्चा करण्यात आली आहे. आयफोन १६ प्रो मॅक्स मध्ये 4676mAh मोठी बॅटरी असू शकते. तर iPhone 16 Pro ला 3,355mAh च्या मोठ्या बॅटरीसह बॅटरी बंप मिळू शकतो. त्याच्या पाठोपाठ व्हॅनिला आयफोन १६ सुद्धा मोठ्या 3561mAh बॅटरीसह येऊ शकतो.

आयफोन १५ प्लस सोबत आयफोन १६ प्लस ला कम्पेअर केला तर त्यात 4,006mAh बॅटरी असू शकते, जी iPhone 15 Plus वरील 4383mAh बॅटरीपेक्षा खूपच कमी आहे. जो Apple पर्यंत कंपनी अधिकृत रित्या आयफोन १६ प्लस लाँच करत नाही तो पर्यंत अजून बऱ्याच अफवांना उधाण येईल.


Exit mobile version