Site icon Maharajya Times

टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षांच्या मते, भारताने आपले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन दुप्पट केले पाहिजे.

India should double the electronics manufacturing, statement by chairman of Tata electronics.

Tata Electronics Chairman Mr. Banmali Agrawala’s view about Indian Electronics Manufacturing Industry: टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन बनमाली अग्रवाला यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवर आपलं मत मांडले आहे. त्याच्यामते मॅन्युफॅक्चरिंग फ्रंट वर भारताची गती मंदावली आहे. आणि आता उत्पादन लवकरात लवकर वाढवण्याची गरज आहे.

मूळ उपकरण मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या उत्पादकांसाठी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस दुप्पट करण्याची गरज आहे. या सेवांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, डिसाईनिंग, कंपोनंन्ट चाचणी आणि असेंब्ली हे सर्व दुप्पटीने वाढवण्याची गरज आहे. तरच भारत आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मध्ये टिकू शकतो.


बनमाली अग्रवाला यांनी सांगितले कि, “उत्पादन क्षेत्रातील जागतिक व्यापारात आपला वाटा नगण्य आहे, त्यामुळे वाढीसाठी भरपूर वाव आहे. इलेक्ट्रॉनिक्सचा स्वतःचा जागतिक व्यापार 5 ट्रिलियन USD(अमेरिकन डॉलर ) इतका आहे. जगभरातील डिजिटलायझेशनचा वेग पाहता, तो फक्त वाढतच जाणार आहे, आणि भारताने ही अशी गोष्ट केलीच पाहिजे.

पुढे ते असेही बोलले की सध्या भारतातील अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स चा वापर हा दीर्घकालीन आर्थिक विकास साधण्यासाठी पुरेसा नाही आहे. आणि भारताला जागतिक मार्केटमध्ये आपला वाटा वाढवण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे.

सरकारनेही आतापर्यंत जसे सहकार्य केले आहे तसेच पुढे चालू ठेऊन, उत्पादनासाठी सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी.

या बाबतीत ते अजून बोलले कि वीज आणि पाणी पुरवठ्याचे नुसते प्रमाण नाही तर गुणवत्ता देखील महत्त्वाची आहे. यामुळे फरक पडतो; विमानतळांशी कनेक्टिव्हिटी, विमानतळांच्या समीपतेच्या दृष्टीने रसद, कारण कंपोनंट इंडस्ट्रीचे दळणवळण हे हवाई मार्गाने होते. या सक्षम पायाभूत सुविधांची खात्री करण्यासाठी सरकार चांगले काम करेल. यातील बरेच काही राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहे.

शेवटी त्यांनी या (Electronics Manufacturing) इंडस्ट्रीला लागणाऱ्या कामगार वर्गाबद्दल हि सांगितले कि, “आपण तरुणांबद्दल बोलत आहोत, 50,000-70,000 लोक एकाच कारखान्यात किंवा एका ठिकाणी काम करतात, 20-25 वयोगटातील, बहुतेक स्त्रिया, त्यामुळे आपल्याला शिक्षण, आरोग्य सेवा आणि मनोरंजनासाठी सहाय्यक परिसंस्था कार्यरत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

त्यांच्या मते बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांचे सेटप भारतात रोवले आणि खूप फायदा करून घेतला. आता भारतातील कॉर्पोरेट्सनी सुद्धा जुनाट विचारपद्धती सोडून थोडी मोजकी रिस्क घेऊन या संधींचा फायदा नक्की उठवला पाहिजे.


 

Exit mobile version