सोन्या चांदीच्या किमती वाढतच आहेत. आज सोन्याचा दर रु. ७२०००/१० ग्रॅम च्या पुढे गेला असून. चांदीच्या दराने सुद्धा नवा उच्चांक गाठला आहे. चांदी आता रु. ८४०००/ १ किलो झाली आहे. डॉलर ची इंडेक्स वाढत १०५ च्या वर गेली आहे. एम सि एक्स जून गोल्ड फ्युचर किंमत पोहोचली रु. ७२,६७८.
Gold Price Today:
आजच्या धमाकेदार ट्रेडिंग सेशन मध्ये सोन्याने रु. ७२००० प्रति १० ग्रॅम चा भाव पार केला आहे. तर दुसरीकडे चांदीही पोहोचली रु. ८४००० प्रति किलो भाव पर्यंत, जो आज पर्यंतचा सर्वात जास्त दर आहे. डॉलर इंडेक्स वाढली असताना सुद्धा हा चमत्कार घडला आहे. सध्या डॉलर इंडेक्स १०५ च्या वर आहे.
इकॉनॉमिक टाइम्स नुसार, सॉफ्ट यु एस पी पी आय चलनवाढी मुळे, मार्केट मध्ये बुलियन(वाढत्या दरावर इन्व्हेस्ट करणारे) च्या भावना उंचावल्या आणि सोन्याचा भाव वाढत गेला.
एच डी एफ सि च्या कमोडिटी आणि करन्सी चे प्रमुख अनुज गुप्ता यांनी सांगितले कि एम सि एक्स (भारताचे मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वरील किमती एप्रिल महिन्यामध्ये ५.८६% किंवा रु. ३९६७ ने वाढल्या आहेत. मागील एका वर्षात आजच्या तारखे पर्यंत हि वाढ रु. ८४४२ किंवा १३.३६ % इतकी वाढली आहे.
चांदीच्या सौद्याच्या बाबतीत गुप्ता यांनी उल्लेख केला कि मासिक नफा हा ९.८६% किंवा रु. ७,७९९ जो मागील वर्षापासून आजच्या तारखे पर्यंत बघितला तर नफा ११.३१% किंवा रु. ८४००० इथे पोहोचला आहे.