या फॅमिली कार चे फीचर्स ऐकून उडतील तुमचे होश,सज्ज व्हा घेण्यासाठी Mahindra Thar 5 Door

महिंद्रा ऑटो लवकरच घेऊन येत आहे Mahindra Thar 5 Door. जी Mahindra Armada या नावाने सुद्धा ओळखली जाईल.आधीची Mahindra Thar 3 Door हि थोडी कॉम्पॅक्ट आणि फॅमिली ओरिएंडटेड नसल्याने महिंद्रा कंपनी ने हि नवीन कार लाँच करायच ठरवलं आहे, जी खूप प्रशस्त आणि फॅमिलीला वापरण्यासाठी उपयुक्त असेल.

Mahindra Thar 5 Door

Mahindra Thar 5 Door/ Mahindra Armada Interior:

इंटिरियरचा विचार केला तर नवीन Mahindra Thar 5 Door मध्ये जुन्या सारखच पण काही नवीन बदलांसोबत इंटिरियर आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सीट कव्हर आणि डॅशबोर्ड मध्ये काही नवीन रंगांच कॉम्बिनेशन सुद्धा पाहायला मिळण्याची संभावना आहे.

स्पॉट झालेल्या नवीन Mahindra 5 Door मध्ये मोठी टचस्क्रिन बघायला मिळते जे एक उत्तम आणि सोयीस्कर फिचर आहे.

Mahindra Thar 5 Door

गाडीची लांबी वाढल्यामुळे मागे तुम्हाला बूटस्पेस पण छान भेटेल. सनरुफ सुद्धा मिळते. आधीच्या Thar मध्ये अगदीच मर्यादित जागा असल्यामुळे फॅमिली कार म्हणून या गाडीला जास्त प्रिफरन्स दिला जात न्हवता पण आता मात्र नवीन Mahindra Thar 5 Door लोकांच्या पसंदीस नक्की पडेल अस वाटतंय.


Engine Specification:

Mahindra Thar 2024 5 Door अपेक्षित इंजिन स्पेसिफिकेशन खालील प्रमाणे,

 2.0 Petrol Manual2.0 Petrol Automatic2.2 Diesel Manual2.2 Diesel Automatic
Engine Displacement1997 CC1997 CC2184 CC2184 CC
Cylinders4444
Max Power200PS @ 5000rpm200PS @ 5000rpm185PS @ 3500rpm185PS @ 3500rpm
Max Torque380Nm @ 1750 – 3000rpm380Nm @ 1750 – 3000rpm429Nm @ 1600 – 2800rpm429Nm @ 1600 – 2800rpm
Transmission6 Speed MT6 Speed AT6 Speed MT6 Speed AT

Off Road Drive in Mahindra Thar 5 Door:

ऑफ रोडींग चा विचार केला तर नवीन Thar हि थोडी जास्त लांब असल्यामुळे थोडा फार त्याचा परिणाम होईल ऑफ रोडींगवर, पण मुळात फॅमिली कार कन्सिडर केलं तर ऑफ रोडींग ला विशेष महत्व दिलं जाणार नाही. तसंही फार कमी लोक ऑफ रोडींग चा आनंद घेतात.

Expected new features:

बाकीच्या c-segment SUV च्या ऐवजी या गाडीला लोकांनि निवडावे यासाठी काही अतिरिक्त  फिचर्स कंपनीने द्यावेत अशी अपेक्षा आहे. जे खालील प्रमाणे आहेत:

  • Rear AC vents
  • Rear Armrest
  • New Alloy Wheel Design
  • Power-Folding mirrors

Variant wise expected pricing:

 गाडीची अपेक्षित किंमत साधारण १३ लाख* ते २० लाख* च्या दरम्यान असेल. व्हेरियंट नुसार अपेक्षित किंमत खालील प्रमाणे असेल.

MAHINDRA ARMADA 2024 (THAR 5-DOOR)
VARIANT-WISE EXPECTED PRICE
Variant-DrivetrainPetrol-ATPetrol-MTDiesel-MTDiesel-AT
Base 2WDRs. 13.0 lakhRs. 13.60 lakh
Mid 2WDRs. 15.50 lakhRs. 14.0 lakhRs. 14.60 lakhRs. 16.10 lakh
High 2WDRs. 16.50 lakhRs. 15.0 lakhRs. 15.60 lakhRs. 17.10 lakh
Mid 4WDRs. 17.10 lakhRs. 18.60 lakh
High 4WDRs. 19.0 lakhRs. 18.10 lakhRs. 19.60 lakh
High 4WD MLDRs. 18.30 lakhRs. 19.80 lakh

सध्या महिंद्रा कडे Hyundai Creta, Maruti Suzuki Brezza आणि अशा बऱ्याच सी सेगमेंट गाड्यांसोबत डायरेक्ट स्पर्धा करणारी अशी कोणती कार नाही आहे. पण Mahindra Armada किंवा Mahindra Thar 5 Door लाँच झाल्यावर मात्र लोकांचा लक्ष ह्या कार कडे नक्की वळेल. तसंच या मध्ये २ व्हील ड्राईव्ह चे पर्याय खूप आहेत, ज्यामुळे मार्केट मध्ये हि गाडी धुमाकूळ घालणार हे नक्की.  


Leave a Comment