Site icon Maharajya Times

ENIL चा FY24 वर्षाचा एकत्रित महसूल पोहोचला ₹500 कोटी पर्यंत, रेडिओ आणि डिजिटल विस्तारामुळे झाली इतकी वाढ

भारतातील #1 एफएम रेडिओ चॅनेल रेडिओ मिर्चीचे (Radio Mirchi) ऑपरेटर, एंटरटेनमेंट नेटवर्क (इंडिया) लिमिटेड ने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही आणि पूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत.

ENIL FY24 Revenue Surges, Hits ₹500 Crore Milestone:

या Q4FY24 तिमाहीत, एकूण महसूल ₹149.3 कोटी इतका झाला, जो Q4FY23 च्या तुलनेत लक्षणीय ठरला असून एकूण 42.4% वाढ झाली आहे. त्यांच्या रेडिओ आणि नॉन-एफसीटी विभागांद्वारे हि वाढ शक्य झाली आणि हि खूप व्यापक आहे. Q4FY24 या तिमाहीत, रेडिओच्या महसुलात २६.४% वाढ झाली असून, नॉन-एफसीटी महसुलात ४८.१% इतकी वाढ झाली आहे.

संपूर्ण FY24 मध्ये, Non-FCT 8% ने वाढली असून, रेडिओने 10.8% ची वाढ अनुभवली आहे. एकत्रित महसूल FY24 साठी ₹500 कोटींवर पोहोचला, वर्षभरात 13.6% इतकी वाढ नोंदवली गेली आहे.

FY24 साठी EBITDA ( Earnings Before Interest, Taxes, Depreciation and Amortization ) डिजिटल वगळता हा ₹125.4 कोटींवर पोहोचला. जो वार्षिक 34.5% ची मजबूत वाढ सिद्ध करतो. मजबूत टॉप-लाइन वाढ आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेमुळे मिळालेली चालना हे या वाढी मागचे मुख्य कारण आहे. Q4FY24 मध्ये, आमचा EBITDA (डिजिटल वगळून)
FY23 च्या चौथ्या तिमाहिच्या तुलनेत ₹23 कोटींवरून ₹36 कोटींवर पोहोचला.

Q4FY24 साठी डिजिटल विभागातील महसूल ₹20.3 कोटींवर पोहोचला, जो रेडिओ महसूलाच्या 24.4% आहे, तर FY24
डिजिटल विभागातील महसूल ₹47 कोटी इतका आहे, जो रेडिओ महसूलाच्या 15.3% इतका आहे.

परिचालन कार्यक्षमतेतील सुधारणांमुळे PAT मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, जो सध्याच्या व्यवसायासाठी FY23 मध्ये ₹2.34 कोटींवरून वाढत जाऊन FY24 मध्ये ₹50.6 कोटी पर्यंत पोहोचला.


ENIL FY24 Revenue developments:

या विकासावर भाष्य करताना, ENIL चे सीईओ श्री यतीश महर्षी म्हणाले कि,

मला आमच्या FY24 महसूल आणि नफा या दोन्ही बाबतीत झालेल्या कामगिरी बद्दल आनंद झाला आहे. रेडिओ आणि डिजिटल विस्तारावर आमचा धोरणात्मक भर आहे. बाजारातील शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, जी चालू तिमाहीत अंदाजे 26% पर्यंत पोहोचली आहे. गाना आणि आमच्या डिजिटल पोर्टफोलिओ चे एकत्रीकरण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे भारताच्या ऑडिओ मनोरंजन क्षेत्रामध्ये आमचे नेतृत्व आणखी मजबूत होत आहे. शेयरहोल्डर्स आणि ग्राहक दोन्हीसाठी शाश्वत मूल्य आणि फायदेशीर वाढ निर्माण करण्यात आम्ही स्थिर आहोत.

३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी एकूण ₹७१५.०६ लाख (मागील वर्षासाठी ₹४७६.७० लाख) अशा प्रकारे संचालक मंडळाने (बोर्ड ऑफ डिरेक्टर्स) प्रत्येकी ₹ 10/- च्या इक्विटी शेअरला प्रति ₹ 1.50/- (मागील वर्षी ₹ 1/-) लाभांशाची शिफारस केली आहे. पेमेंट हे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत शेयरहोल्डर्सच्या मान्यतेच्या अधीन आहे.


Exit mobile version