Site icon Maharajya Times

जागतिक जल दिन २०२४, कशासाठी हा दिवस साजरा होतो? काय आहे याचे महत्व?

World Water Day 2024 Celebration

World Water Day 2024 Celebration: आपल्या सर्वांनाच माहित आहे की पाणी किती महत्वाचे आहे. पाण्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही. पण तरीही बऱ्याच लोकांकडून कळत न कळत पाण्याचा अपव्यय होतो. पण पाणी हे जीवन आहे अस म्हंटलं जात तर या बाबत पुनरजागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा जागतिक जल दिन साजरा केला जातो.


काय आहे याचा इतिहास ?

तर १९९३ ला या दिवसाची सुरुवात करण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत याचा निर्णय घेण्यात आला होता. गोड्या पाण्याची गरज त्याचे महत्व आणि संवर्धन या बाबतीत लोकांना सचेत आणि जागरूक ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. खर तर १९९२ ला संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत या बाबतीत प्रथम चर्चा करून निर्णय घेतला गेला. हि परिषद रिओ दि जानेरो, ब्राझील येथे घेण्यात आली होती. पण दिवस साजरा करण्यास १९९३ पासून सुरुवात झाली.


जागतिक जल दिनाचे महत्व:

संयुक्त राष्ट्राच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार, हा दिवस साजरा करणे या मागे सर्वात महत्वाचे उद्देश्य हे आहे कि २०३० पर्यंत सर्वांना शुद्ध पाणी आणि स्वछता पोहोचावी हे आहे.
अजूनहि बऱ्याच लोकांना पाण्याच्या अभावी रोगराई आणि अस्वछतेला सामोरे जावे लागते. तर असे होऊ नये “जल हि जीवन” हा संदेश जो आपण नेहमी ऐकत आलो आहोत, सर्वाना मिळावा व सगळ्यांनी पाण्याचे महत्व जाणणे गरजेचे आहे.

दरवर्षी संयुक्त राष्ट्राची टीम जागतिक जल दिनासाठी एक थीम तयार करते. २०२४ साठी “Leveraging Water for Peace” म्हणजे शांततेसाठी पाण्याचा उपयोग असं साधारण त्यांच लक्ष आहे. आणि याआधीच्या थीम्स जर तुम्हाला जाणून घायचा असतील तर तुम्ही संयुक्त राष्ट्राच्या UNWater या वेबसाईट वर जाऊन त्याची माहिती अगदी डिटेल मध्ये मिळवू शकता.


पाण्याची बचत कशी करावी:

  1. सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरामध्ये नळ गळत तर नाही आहेत ना याची काळजी घ्यावी म्हणजे विनाकारण होणारी पाण्याची नासाडी थांबेल.
  2. याच्या शिवाय तुमच्या घराची पाण्याची पाईप लाईन कुठे गळू नये याची काळजी घ्या.
  3. अति पाणी वापरणारे वॉशिंग मशीन वापरू नका. कमी कमी पाण्यात योग्य व स्वच्छ पद्धतीने कपडे धुणारे आणि पाणी वाचवणारे वाशिंग मशीन वापरा.
  4. झाडाला पाणी घालताना स्प्रिंकलर वापरून पाणी घाला म्हणजे पाणी वाया जाणार नाही आणि जास्तीत जास्त झाडांना पाणी घालता येईल.
  5. कार वॉश शक्यतो वॉशिंग सेंटर ला करून आणा. कारण त्यांच्याकडे जे मशीन असत ते कमी पाणी वापरून फोर्सचा वापर करून कार स्वच्छ करते. घरी जर आपण मगने पाणी टाकून गाडी धुतली तर बरेच पाणी वाया जाते आणि गाडी सुद्धा तितकी स्वछ होत नाही.

हे आणि असे अनेक उपाय आहेत पाणी वाचवण्याचे जे आपण अमलात आणू शकतो व पाणी वाचवण्यास मदत करू शकतो. सर्वांना जागतिक जल दिन २०२४ च्या हार्दिक शुभेच्छा!!!


Exit mobile version