ब्रिक्सटन मोटरसायकल्स कंपनीची भारतात एन्ट्री, लवकरच सुरु करणार उत्पादन

Brixton Motorcycles Roars into Indian Market, Big News Alert:

ब्रिक्सटन मोटरसायकल्स हि एक ऑस्ट्रियन मोटरसायकल्स उत्पादन करणारी कंपनी आहे. आणि हि कंपनी भारतीय मार्केट मध्ये प्रवेश करणार आहे. सुरवातीला ते चार वेगळे मोटरसायकल मॉडेल लाँच करणार आहेत. या कंपनीने के ए डब्लू वेलोस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत पार्टनरशिप केली आहे. भारतात लाँच होण्यामागे या कंपनीचा हाच उद्देश आहे कि भारतीय रायडर्सना यूरोप मधील एलिगंट बाईक्स चालवण्यास मिळाव्यात.

एका मीडिया रिलीस मध्ये कंपनीने असे सांगितले कि गेल्या दोन वर्षांपासून ते के ए डब्लू वेलोस मोटर्स सोबत प्लॅनींग करून भारतात लाँच होण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि आता ते लवकरच प्रोडक्शन सुरु करणार आहेत. भारत देशाने मोटारसायकल्स मार्केट मध्ये संपूर्ण जगात स्वतः च एक वेगळ स्थान बनवलं आहे. आणि याच मार्केटचा फायदा घेण्याचे या कंपनीने ठरवलं आहे. तसेही कंपनी यूरोप मध्ये आणि साऊथ ईस्ट एशिया मध्ये आपल रेप्युटेशन चांगल राखून अग्रेसर होत आहे.

जे चार युनिक मॉडेल्स कंपनी लाँच करणार आहे त्याचं डिजाईन हे कंपनीच्या ऑस्ट्रियामधील प्लांट मध्ये तयार होणार आहे. आणि त्यानंतर प्रोडक्शन हे कोल्हापूर महाराष्ट्र येथील एका स्वतंत्र प्लांट मध्ये होणार आहे ज्यामध्ये के ए डब्लू ग्रुपच्या उत्पादन कौशल्याचा उपयोग केला जाईल.

या सोबतच या दोन्ही कंपन्या मिळून एक रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर सुद्धा सुरु करणार आहेत. जिथे नव नवीन मोटारसायकल तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल ज्या भारतीय मार्केटच्या गरजा लक्षात घेऊन बनवल्या जातील. आणि पुढे भारत या मोटरसायकल्स चा एक्स्पोर्ट हब तयार होईन या मोटारसायकल्स साऊथ ईस्ट एशिया आणि आफ्रिकन मार्केट मध्ये एक्स्पोर्ट केल्या जातील.

ब्रिक्सटन मोटरसायकल्स (Brixton Motorcycles)भारतामध्ये एक मोठं डिलरशिप नेटवर्क बनवणार आहे. ज्याची सुरवात १५ डिलरशिप्स पासून करण्यात येईल, ज्याची पूर्तता २०२४ च्या शेवट पर्यंत होऊन जाईल. पुढच्या वर्षामध्ये या डिलरशिप्स ५० पर्यंत वाढवण्यात येतील. ज्यामुळे ग्राहकांना सर्व्हिस घेणे सोप्पे जाईल.

के व्ही एम पी एल चे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके यांनी या बाबत सांगितले कि, “आम्ही हा प्रतिष्ठित ब्रँड भारतीय मोटारसायकल समुदायासमोर आणताना आनंदी आहोत. लॉन्चची पुष्टी झाल्यावर, लवकरच आणखी रोमांचक बातम्यांसाठी संपर्कात रहा!


Leave a Comment