ॲस्टन मार्टिनची नवीन ‘व्हँटेज’ कार लाँच झाली, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Aston Martin Launches New Vantage in Indian Market

Aston Martin Launches New Vantage in Indian Market:

भारतातील लक्झरी कार प्रेमींना खुश होण्यासाठी एक नवीन कारण, ॲस्टन मार्टिन या प्रतिष्ठित ब्रिटीश कंपनीने मंगळवारी त्यांची लेटेस्ट ‘व्हँटेज’ स्पोर्ट्स कार लाँच केली. या कारची किंमत आहे रुपये 3.99 कोटी (एक्स-शोरूम), हि नवीन व्हँटेज कार देशातील स्पोर्ट्स कार प्रेमींना एक वेगळाच आणि विलक्षण ड्रायव्हिंग अनुभव देण्यास सज्ज आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक स्तरावर अनावरण केले गेलेल्या या कार मध्ये आधीच्या मॉडेलच्या मानाने बरेच बदल करण्यात आले आहेत. यामध्ये पृष्ठभागावर आणि आतील इंटेरियर मध्ये जास्त करून बदल करण्यात आले आहेत.

या कार बद्दल कंपनीचे असे म्हणणे आहे कि हि कार पॉवर आणि स्टाइलचे एक वेगेळेच मिश्रण आहे. वन-77 सुपरकारच्या डिझाइनच्या वारशातून प्रेरणा घेऊन हि कार तयार होऊन आपलं एक युनिक स्थान निर्माण करत आहे.

ॲस्टन मार्टिनचे सीईओ ॲमेडीओ फेलिसा यांनी एका निवेदनात सांगितले कि, “व्हँटेज नावाच्या कोणत्याही कारमध्ये जगण्यासारखे बरेच काही आहे, म्हणूनच हे नवीन मॉडेल त्याच्या शुद्ध आणि सर्वात स्पष्ट स्वरूपात उच्च कार्यक्षमतेसाठी वचनबद्ध आहे.

“आश्वासक शैली, सर्व-नवीन इंटीरियर आणि अत्याधुनिक इन्फोटेनमेंटसह, व्हँटेज प्रत्येक बाबतीत जागतिक दर्जाची आहे.” असं फेलिसा यांनी पुढे नमूद केले.

Aston Martin Launches New Vantage in Indian Market

New Aston Martin Vantage

दिसण्यापासून सुरुवात केली तर या कारला, नवीन बम्पर, सुधारित हेडलॅम्प, रुंद ग्रील आणि नवीन बोनेटसह अपडेटेड लूक मिळतो. पुढच्या चाकांच्या मागे असलेल्या व्हेंट्सना देखील पुन्हा डिझाइन केले गेले आहे. तर मागील बाजूस पुन्हा डिझाइन केलेल्या एअर व्हेंट्ससह एक नवीन बंपर मिळतो. या व्हँटेज कारला 21-इंच सॅटिन सिल्व्हर अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत.

नवीन व्हँटेजमध्ये(New Aston Martin Vantage) अपग्रेड केलेले 4.0-लिटर ट्विन-टर्बोचार्ज V8 इंजिन आहे, जे कारला केवळ 3.4 सेकंदात 325 kmph ची सर्वोच्च गती प्राप्त करून देते. ॲस्टन मार्टिन अभियंत्यांनी जबरदस्त आणि सेफ ड्रायव्हिंग अनुभवण्यासाठी चार चे वजन हे उत्कृष्टरित्या 50:50 या प्रमाणात वितरित केले आहे. यामुळे अपवादात्मक हाताळणी गतिशीलता सुनिश्चित केली आहे.

ॲस्टन मार्टिनचे मुख्य तांत्रिक अधिकारी रॉबर्टो फेडेली यांनी स्पष्ट केले, “इंडस्ट्रीमधील अग्रेसर ॲक्टिव्ह व्हेईकल डायनॅमिक्सच्या सहाय्याने पूर्णपणे संतुलित फ्रंट-इंजिनयुक्त रीअर-व्हील ड्राइव्ह चेसिससह, संपूर्ण क्षमतेची जोड देते.”

ॲस्टन मार्टिन तिच्या bespoke Q विभागातील पेंट फिनिश, विविध अलॉय व्हील डिझाइन्स, कार्बन सिरेमिक डिस्क ब्रेक्स, हलक्या वजनाच्या कार्बनफायबर सीट आणि बरेच काही यासह अनेक सानुकूलित पर्याय ऑफर करेल.


Leave a Comment