Site icon Maharajya Times

अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Alibaba aani chalishitale chor movie

Alibaba aani chalishitale chor movie update:अलीबाबा आणि चाळीशीतले चोर चित्रपटाचा ऑफिसिअल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली होतीच जेव्हा टीजर रिलीज झाला होता तेव्हा. आता ट्रेलर पाहून अजूनच उत्कंठा वाढेल.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केल आहे. याच लेखन विवेक बेळे यांनी केल असून, याची निर्मिती नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे यांनी केली आहे.

या चित्रपटाच्या स्टार कास्ट मध्ये आहेत, अतुल परचुरे, आनंद इंगळे, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रुती मराठे आणि मधुरा वेलणकर-साटम.

ट्रेलर पाहिल्यानंतर साधारण कथानक लक्षात येत. त्यात प्रथमता जो सिन आहे, त्या मध्ये काही मध्यम वयातील जोडपी हि पार्टी करत आहेत. अचानक लाईट जाते व अंधारात कुणीतरी कुणाचे तरी चुंबन घेण्याचा आवाज येतो. आणि त्यानंतर कानाखाली वाजवण्याचा आवाज पण येतो. आता या घटनेमुळे त्या जोडप्यांमध्ये नकळत चर्चा सुरु होते आणि या गोष्टीचा परिणाम कसा त्यांच्या आयुष्यावर व्हायला लागतो व गोंधळ निर्माण होतो असं साधारण दाखवलय. एकूणच या मध्ये कॉमेडी आणि सस्पेन्स चा अजब कॉम्बो पाहायला मिळणार हा नक्की.


नितिनवैद्य प्रोडक्शन ने उमेश कामत सोबत त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर या बाबत एक पोस्ट हि शेयर केली आहे.

कॅप्शन पाहूनच समजतंय कि चित्रपटाची कथा हि साधारण आंबट-गोड तिखट आणि गॉसिप ने भरलेली असणार आहे. हा चित्रपट २९ मार्च २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आवर्जून पहा व आपला रिव्युव्ह आम्हाला कळवा.


Exit mobile version