श्रीराम नवमी २०२४: श्रीराम जन्मोत्सव

Shri Ram Navami 2024: श्रीराम नवमी हा हिंदू संस्कृतीमधील एक महत्वाचा उत्सव आहे. चैत्र महिन्याच्या या नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. हा दिवस प्रत्येक सनातन धर्मीयांसाठी आनंदाचा आणि मांगल्याचा आहे. हिंदू धर्म ग्रंथानुसार प्रभू श्रीराम हा भगवान विष्णूंचा 7 वा अवतार आहे. आणि भगवान विष्णूंच्या प्रमुख 10 अवतारांपैकी हा अवतार आहे. प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असेही म्हणतात.


भगवान श्रीराम जन्म:

पवित्र हिंदू धर्म ग्रंथ रामायणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचा जन्म हा शरयू नदी काठी वसलेल्या अयोध्या नगरी मध्ये झाला. अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौशल्येच्या पोटी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. श्रीराम जन्माबद्दल संत तुलसीदास यांनी लिहिलेल्या राम चारीत मानस या ग्रंथामध्ये काही श्लोक आहेत ते खालील प्रमाणे,

दसरथ पुत्रजन्म सुनि काना। मानहु ब्रह्मानंद समाना॥
परम प्रेम मन पुलक सरीरा। चाहत उठन करत मति धीरा॥

भावार्थ: पुत्रजन्म ऐकून दशरथ राजाला ब्रह्मानंदात तल्लीन झाल्यासारखे वाटले. मनात अपार प्रेम, शरीरावर रोमांच उभे राहिले. बुद्धीला संयम देऊन (आनंदात अधीर) (आणि प्रेमाने शिथिल झालेल्या शरीराची काळजी घेऊन) त्यांना उठायची इच्छा झाली.

जाकर नाम सुनत सुभ होई। मोरें गृह आवा प्रभु सोई॥
परमानंद पूरि मन राजा। कहा बोलाइ बजावहु बाजा॥

भावार्थ: ज्याच्या नावाने कल्याण होते तोच परमेश्वर माझ्या घरी आला आहे. हा विचार करून राजाचे मन अपार आनंदाने भरून आले. त्यांनी संगीतकारांना बोलावून वाद्ये वाजवण्यास सांगितले.

प्रभू रामचंद्रांचा जन्म या धरतीला पावन करण्यासाठी तर झालाच पण रावणासारख्या दुष्ट राक्षसाचा अंत करण्यासाठीही झाला. प्रभू श्रीराम हे १६ गुणांनी परिपूर्ण आहेत असं रामायणात वर्णन आहे. ते गुण खालीलप्रमाणे:

  • 1. गुणवान
  • 2. वीर्यवान
  • 3. धर्मज्ञ:
  • 4. कृतज्ञ:
  • 5. दृढ प्रतिज्ञ:
  • 6. सत्यवक्ता
  • 7. चरित्रवान
  • 8. विद्वान
  • 9. सामर्थ्यवान
  • 10. आत्मवान
  • 11. जितक्रोध:
  • 12. द्युतीमान
  • 13. अनसूयक:
  • 14. कस्य संयुगे देवाश्च बिभ्यति
  • 15. अद्वितीय प्रियदर्शन
  • 16. सर्व भूतेषु को हितः

तर मुखी राम नाम घेऊन साजरी करूया हि खास राम नवमी कारण जसं कि आपणा सर्वाना माहित आहे कि अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामाचे मोठे मन्दिर स्थापन झाले आहे आणि येथील राम लल्लाची मूर्ती स्थापन झाल्यानंतरची हि पहिली राम नवमी आहे.

।। जय श्रीराम ।।


Leave a Comment