Maharashtra Board Exams 2024 Results: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे हे लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (10 वी ) 2024 चा निकाल जाहीर करण्याच्या तयारीला लागले आहेत. तर विध्यार्थी लवकरच आपला निकाल मिळवण्याची अपेक्षा करू शकतात. निकालाची घोषणा हि एप्रिल महिन्याच्या ३ ऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. एकदा निकाल जाहीर झाला कि विध्यार्थी mahresult.nic.in या वेबसाईट ला भेट देऊन आपला निकाल पाहू शकतात आणि डाउनलोड पण करू शकतात.
अहवालानुसार निकाल लागण्याची घोषणा हि एप्रिल महिन्याच्या ३ ऱ्या आठवड्यात जाहीर झाल्यावर विद्यार्थी त्यांचे रोल नंबर वापरून mahresult.nic.in या वेबसाईट वर जाऊन त्यांचे गुण मिळवू शकतात.
महाराष्ट्र राज्य 10वी आणि 12वी 2024 चा निकाल कसा तपासायचा?
- स्टेप 1 : mahresult.nic.in या वेबसाईट ला भेट द्या.
- स्टेप 2 : मुख्य पानावर(पेजवर) महाराष्ट्र SSC आणि HSC निकाल 2024 या लिंक वर क्लिक करा.
- स्टेप 3 : तुम्हाला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल म्हणजेच तुम्ही एका नवीन पेज वर पोहोचाल. तिथे आवश्यक ते क्रेडेन्शियल (ओळखपत्र माहिती) जसं कि तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव हे भरावे लागेल आणि मग सबमिट बटन क्लिक करावे लागले.
- स्टेप 4 : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा 10 वी आणि 12 वी 2004 चा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
- स्टेप 5 : आता तुमच्या निकालाची प्रिंट घ्या किंवा भविष्यात वापरासाठी डाउनलोड करा.
पास होण्यासाठीचा निकष(Maharashtra Board Exams)
दोन्ही 10 वी(SSC) आणि 12 वी(HSC) वर्गासाठी पास होण्यासाठीचा निकष हा मागील वर्षाप्रमाणेच आहे. उत्तीर्ण होण्यासाठी विध्यार्थ्याला प्रत्येक विषयात 35% मार्क्स सुरक्षित करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये सर्व विषयांच्या (ऑपशनल धरून) थेरी आणि प्रॅक्टिकल परीक्षा यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य SSC (10 वी) 2023 चा निकाल:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षांचा २०२३ चा निकाल हा खूप चांगल्या पद्धतीने लागला होता. 15,29,096 विध्यार्थी परीक्षेला बसले होते ज्यामध्ये 14,34,898 विध्यार्थी पास झाले. म्हणजे पासिंग पर्सेंटेज हि साधारण 93.83 % इतकी होती. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 151 विध्यार्थ्यानी खूप चांगले स्कोरिंग केले. सर्वोतकृष्ट मार्क म्हणजेच १०० % मार्क्स आणणारे विध्यार्थी हे लातूर विभागातील होते. त्यानंतर कोकण, औरंगाबाद, अमरावती, पुणे आणि मुंबई या विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन!
महाराष्ट्र राज्य HSC (12वी) 2023 चा निकाल:
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा २०२३ चा निकाल पाहिला तर एकूण पासिंग पर्सेन्टेज हि ९१.२५ % इतकी होती. २०२२ च्या प्रमाणात हि पासिंग पर्सेन्टेज कमी निघाली. मुलांच्या तुलनेत मुलींनी खूपच उत्कृष्ट कामगिरी बजावली. ज्यामध्ये मुलींचा पासिंग रेट हा 94.73 % इतका होता. तर मुलांचा पासिंग रेट हा 89.14 % इतका होता. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन!