Site icon Maharajya Times

5 अशी फळे जी तुम्ही उन्हाळ्यात नक्की खायला हवीत

5 essential summer fruits

उन्हाळा आला कि आपल्याला सतत घाम यायला लागतो, पण शरीलाला आलेला घाम हे आपलं शरीर थंड ठेवण्यास मदत करतो. मग उन्ह्याळ्यात फक्त पाणी पिऊन आपण डिहायड्रेशन टाळू शकतो का तर नाही, आपण फळे खाऊन सुद्धा शरीराची पाण्याची कमतरता भरून काढू शकतो. म्हणूनच आम्ही ५ अशा फळांची(Summer Fruits) सूची घेऊन आलो आहोत जी तुम्ही उन्हाळ्यात नक्की खाल्ली पाहिजेत.


1.पेरू(Guava):

पेरू मध्ये खूप फायबर्स असतात ज्यामुळे उन्हाळ्यात पचनाला खूप मदत होते. उन्हाळ्यात आपली पचन संस्था थोडी मंदावते ज्यामुळे आपल्याला कमी मसाल्याचे आणि पोट भरून सुद्धा जड न वाटणारे पदार्थ खाणे गरजेचे असते.

हे असे फळ आहे जे खाल्यानंतर शरीरातील साखरेची पातळी कमी हि होत नाही आणि वाढत हि नाही. तर मधुमेह असलेले लोक सुद्धा हे फळ अगदी बिनधास्त खाऊ शकतात. हे फळ मासिक पाळीच्या वेदना सुद्धा कमी करते आणि तुमची त्वचा थंड आणि जळजळ मुक्त ठेवण्यास मदत करते.


2.कलिंगड(Watermelon):

कलिंगड हे पाणीदार आणि भरपूर जीवनसत्वे आणि पोटॅशिअम ने भरलेले असते. यामध्ये व्हिटॅमिन A, B6 आणि C हि जीवनसत्वे असतात. या मधील पोषक तत्वे तुम्हाला बऱ्याच ऍलर्जी पासून वाचवतात, तसेच तुमची प्रतिकार शक्ती वाढवून तुम्हाला साधा खोकला आणि सर्दीच्या होणाऱ्या त्रासापासून तुम्हाला संरक्षित करतात.

यांच्यातील जास्त पाण्याचे प्रमाण तुम्हाला डिहायड्रेशन होण्यापासून वाचवते आणि यातील पोटॅशिअम तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देत नाही. तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारून तुमचे स्नायू लवचिक ठेवण्यास मदत करते.


3.पपई(Papaya):

यामध्ये बीटा कॅरोटीन असल्यामुळे तुमचा डोळ्यांना जळजळ होत नाही व तीव्र उन्हामुळे डोळ्यावर येणाऱ्या ताणाला कमी करते. तसेच हे अँटी-ऑक्सिडंट असल्यामुळे हृदयाला खूप पोषक आहे.

यामध्ये व्हिटॅमिन ए, सी तसेच फॉलिएट्स आणि फायटोकेमिकल्स सारखी पोषक तत्वे असतात. जी आपल्या शरीराला खूप गरजेची असतात.


4.आंबा(Mango):

यामध्ये पिवळ्या रंगाचे रंगद्रव्य असते जे तुमच्या डोळ्यात हानिकारक प्रकाश किरणे जाण्यापासून प्रतिबंधित करते. आंब्यामध्ये संपूर्ण जीवनसत्वे, पोटॅशियम आणि भरपूर फायबर असते. जे पचनशक्ती वाढवते.

या मधील कॅलरीज तुम्हाला ऊर्जेने भरून ठेवते आणि उन्हाळ्यात येणारा अशक्तपणा दूर ठेवते. हे फळ तुमची भूक हि वाढवते आणि खूप साऱ्या पोषक तत्वांनी भरपूर आहे म्हणुनच याला फळांचा राजा असेही म्हणतात.


5.खरबूज(Muskmelon):

हे फळ ए व्हिटॅमिन ने भरलेलं आहे जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते. तीव्र उन्हामध्ये तुमच्या त्वचेला होणाऱ्या त्रासापासून वाचवते.
खरबूज तुमच्या हृदयाचे ठोके मजबूत ठेवते आणि रक्तदाब स्थिर ठेवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते पचनास मदत करते आणि आतड्याची हालचाल नियमित करते.

अँटी-ऑक्सिडंट आणि बीटा कॅरोटीन ने भरपूर असे हे फळ खूप सुगंधी असते. तसेच यामध्ये पाणी, फॉस्फरस, पोटँशियम, लोह आणि बरीच जीवनसत्वे असतात.

तर उन्ह्याळ्यात हि फळे नक्की खा व आपले आरोग्य जपा. सुरक्षित राहा आणि स्वस्थ राहा.


Exit mobile version